संधीचा फायदा घ्या! SBI होम लोन वर मिळतेय बंपर सूट; पटकन पूर्ण करा घराचे स्वप्न, पहा बातमी..!

Home Loan Offer : आपलं स्वत:चं घर पाहिजे असं सर्वांनाच वाटतं. घरांच्या सतत वाढत असणार्‍या किंमती पाहता बरेच लोक आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून लोन घेतात. तुम्हाला लोन घेऊन घर बांधण्याचा किंवा घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक एसबीआयकडून (SBI) आपल्या ग्राहकांना होम लोनवर 65 बेसिस पॉइंट्सपर्यंत सूट देण्यात येत आहे. एसबीआय बँकेकडून ही सवलत कोणाला मिळणार? आणि या होम लोन सुविधेचा (Home Loan Offer) लाभ कधीपर्यंत घेता येईल? याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

कोणाला मिळणार होम लोन वर सूट? (Home Loan Offer)

बँक नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याच पद्धतीने आता सुद्धा एसबीआय (SBI) बँक आपल्या ग्राहकांसाठी होम लोन वर बंपर सूट घेऊन आली आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन (Home Loan), फ्लेक्सिपे, एनआरआय आणि नॉन सॅलराईड तसेच एम्पलॉईड हाऊसहोल्डसाठी लागू असणार आहे. बॅंकेच्या या सुविधेचा लाभ ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत घेता येणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये बँकेचा सध्याचा एक्स्टर्नल बेंचमार्क दर (EBR) 9.15 टक्के एवढा आहे.

येथे वाचा – आता करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

ज्यांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) 750 ते 800 या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्राहकांना व्याजदरावर 55 बेसिस पॉईंट्सची सूट दिली जात आहे. यानंतर बँक ग्राहकांना 8.60 टक्के एवढ्या व्यादरानं कर्ज देते.

दुसरीकडे ज्यांचा सिबिल स्कोअर 700 ते 749 या दरम्यान आहे अशा ग्राहकांना 65 बेसिस पॉईंट्सची सूट देण्यात येणार आहे. यानंतर बँक ग्राहकांना 8.70 टक्के एवढ्या व्याजदरानं कर्ज मिळणार. सध्याच्या काळात विना सूट हा व्याजदर 9.35 टक्के एवढा आहे. 

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

यांना मिळणार नाही सूट

ज्यांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) 650 ते 699 या दरम्यान आहे त्यांना व्याजदरामध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. आणि ज्यांचा सिबिल स्कोअर 550 ते 649 या दरम्यान असेल त्यांना 30 बेसिस पॉईंट्स एवढी सूट मिळेल. सूट मिळाल्यानंतर व्याजदर 9.45 टक्के एवढा असणार आणि विना सूट हा व्याजदर 9.65 टक्के एवढा आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता येथे कमी पैशात घेता येणार हक्काचे घर; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी असणार घरांची लॉटरी?

Leave a Comment