आता पुण्यात म्हाडा देणार स्वस्त घर; तुम्ही घराची किंमत पाहिली का? अर्ज कसा करायचा? पहा माहिती..!

Pune Mhada Flat : म्हाडाकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधील गृहनिर्माण योजनेंतर्गत (Housing Scheme) 5863 एवढ्या घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता अर्ज ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी 27 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि संगणकीय सोडत 18 ऑक्टोबर रोजी काढली जाणार आहे. म्हाळुंगे या भागातील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेमधील घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहे. त्यामुळे घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Pune Mhada Flat

पुणे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याकडून भरणा अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या सोडतीमधील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेमधील म्हाळुंगे याठिकाणच्या घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी केल्या आहे. या संदर्भात ‘म्हाडा’च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले की “या सोडतीत पुणे जिल्ह्यामधील 5 हजार 425 सदनिका, सोलापूर मधील 69, सांगली मधील 32 आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील 337 सदनिका विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत.

घरांच्या किंमती पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

तसेच या सोडतीमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील (Mhada Housing Scheme) 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत (शहरीसाठी) 431 एवढ्या सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेसाठी 2584 एवढ्या सदनिका आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी 2445 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या कार्यालयामध्ये 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. याकरिता अगोदर नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने नोंदणी करणार्‍यांनाच अर्ज करता येणार आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा माहिती..!

ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर ही आहे. तसेच 29 सप्टेंबर या दिवशी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आरटीजीएस (RTGS) किंवा एनएफईटीच्या (NEFT) माध्यमातून अनामत रक्कम अर्जदारांना भरता येणार आहे. सोडतीची प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोडतीकरिता स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी 7 वाजेला म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

घरांच्या किंमती पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment