म्हाडाची मुंबईतील घरे परवडणारी की आवाक्याबाहेर? पहा 50 टक्क्यांहून जास्त विजेत्यांनी घेतला हा निर्णय..!

Mhada Flat Mumbai : म्हाडांच्या घरांची खासगी विकासकांशी तुलना केली तर म्हाडाची घरे (Mhada Flat Mumbai) त्यापेक्षा स्वस्त आहे. पण म्हाडाच्या घरांच्या उत्पन्न गटाची मर्यादा आणि घरांच्या किमतींमध्ये मोठी तफावत आढळते. याचा मोठा फटका मुंबई मंडळाद्वारे 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमधील विजेत्यांना बसल्याचे उघडकीस आले आहे.

या 4082 घरांच्या सोडतीमधील चक्क 398 एवढ्या विजेत्यांकडून मंडळाला घरे परत करण्यात आली आहे. यामध्ये अत्यल्प गटामधील 224, उच्च गटामधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 64 घरे (1 BHK Flat Mumbai) विजेत्यांकडून नाकारण्यात आली आहेत. किमती आवाक्याबाहेर असल्याने आणि गृहकर्ज (Home Loan) मिळत नसल्याचे कारण देत बर्‍याच जणांनी घरे (2 bhk Flat Mumbai) परत केल्याची चर्चा आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

या सोडतीसाठी तब्बल 1 लाख 22 हजार एवढ्या जणांनी अर्ज केले होते. एवढ्या अर्जदारांपैकी 4 हजार 78 अर्जदार विजेते ठरले. या सोडतीनंतर मंडळाकडून अवघ्या 2 दिवसांमध्येच विजेत्यांना स्वीकृतीपत्र पाठविण्यात आले. या पत्रानुसार 398 एवढ्या विजेत्यांनी घरे परत केले असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार या सोडतीत एकापेक्षा जास्त घरे लागलेल्यांची संख्या जास्त असल्याचे समजते. मात्र असे असले तरी घरे स्विकार न करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. यात 169 विजेत्यांना दोन घरे तर 23 विजेत्यांना तीन घरे आणि 2 विजेत्यांना चार घरे तसेच 2 विजेत्यांना पाच घरे लागली होती. अशी संख्या एकूण 206 एवढी असल्याने उर्वरित 192 घरे देखील परत करण्यात आली आहे. कर्ज मिळाले असले तरी त्याची परतफेड करणे तसेच समान मासिक हप्ता भरणे खूप कठीण होत असल्याची माहिती एका न्यूज वेबसाईटने दिली आहे.

येथे वाचा – आता करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

या सोडतीमध्ये अत्यल्प गटामधील 2790 घरांचा समावेश असून त्यामधील 224 एवढी घरे परत करण्यात आली आहेत. आणि अल्प गटामधील 1034 घरांपैकी 65, मध्यम गटामधील 139 पैकी 45 व उच्च गटा मधील 120 पैकी 64 एवढी घरे विजेत्यांकडून नाकारण्यात आली आहेत.

अत्यल्प गटामध्ये 24 लाख 71 हजारांपासून ते 40 लाख रुपये किमतीच्या घरांचा समावेश आहे. यात पंतप्रधान आवास योजनेमधील सर्वात जास्त घरांचा समावेश आहे. तर, अत्यल्प असलेल्या गटामधील घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण आता हीच घरे विजेत्यांना आवाक्याबाहेर असल्याचं वाटत आहे…

येथे वाचा – घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा; भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा, येथे क्लिक करून वाचा बातमी..

अत्यल्प गटामधील 224 एवढ्या विजेत्यांनी घरे परत केली आहे. त्याच वेळी या सोडतीमध्ये कोट्यवधी किंमतीच्या घरांचा देखील समावेश होता. यात दीड कोटी रुपये या किमतीपासून तर थेट साडेसात कोटी रुपयांपर्यंतचे घरे आहेत. बाजारभावाशी तुलना करता म्हाडाच्या किमती कमी आहे म्हणून ही घरे विकली जातील असे वाटत असतानाच मध्यम गटामधील 54 आणि उच्च गटामधील 64 घरे विजेत्यांनी नाकारली आहे.

Ready to move flat mumbai

एकूण 4078 एवढ्या विजेत्यांपैकी 77 विजेत्यांनी खोटी माहिती दिली असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांच्याबाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे 70 विजेत्यांकडून स्वीकृती पत्रेच सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता नियमाने त्यांचे घर मंडळाकडून रद्द करण्यात येणार आहे. त्यानुसार 468 घरे रद्द केले जाणार आहे. आता या घरांसाठी प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना संधी दिली जाईल आणि त्यामुळे घरे शिल्लक राहणार नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांने दिली आहे.

बाप रे! फक्त आठ महिन्यांत तब्बल 81 हजार मुंबईकरांनी घेतले हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कुठे आहे स्वस्त घरे?

Leave a Comment