मुंबईच्या अंधेरीत 1 BHK फ्लॅटची किंमत किती? मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट घ्यायचाय? पहा बातमी..!

मुंबई : मुंबईत मागील वर्षभरामध्ये महागड्या आणि अलिशान घरांची (Luxury Flats Mumbai) विक्री खूपच वाढली आहे. अलीकडच्या काळात लोक सर्व सोईसुविधा असलेल्या घरांमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळे अशा आलिशान घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याउलट मध्यमवर्गीयांना परवडेल अशा घरांच्या विक्रीत घट झालेली बघायला मिळत आहे. देशामधील मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये 1 कोटींहून जास्त किंमत असणार्‍या घरांची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे.

पण, 40 लाखाच्या आत किंमती असलेल्या घरांची विक्री जवळपास 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. या कॅटेगरीमध्ये 1 बीएचके घरे (1 bhk flats Mumbai) येतात. पण, काही शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेली 1 बीएचकेची घरे देखील सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. अशा 1 बीएचके घरांची मुंबईत किती किंमत आहे आणि दिल्ली, बंगळुरू या शहरात 1 बीएचकेची किंमत किती याची माहिती आपण जाणून घेऊ..

मुंबईतील अंधेरीत 1 बीएचके फ्लॅटची किंमत (1 bhk flat Andheri Mumbai)

मुंबईतील अंधेरी येथे मोक्याच्या ठिकाणी 1 बीएचके घर (1 bhk flat Mumbai) घ्यायचे असेल तर कमीत कमी 1 कोटी रुपये एवढं बजेट असावं लागतं. या ठिकाणी घरभाडे देखील खूपच आहे. त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरू या शहरांचा क्रमांक येतो. नवी दिल्लीतमध्ये देखील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घरांच्या किमती 1 कोटींच्या घरात आहे. आणि इतर प्रमुख शहरांमध्ये 1 बीएचके घरांच्या किंमती 40 लाख रुपयांच्या जवळपास आहेत.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

नाईट फ्रॅंकने दिलेल्या अहवालानुसार 50 लाखांच्या आत किंमत असलेल्या 9 हजार 930 एवढ्या घरांची विक्री पहिल्या सहामाहीमध्ये झाली. आणि 50 लाख ते 1 कोटी यादरम्यान किंमती असलेल्या 29 हजार 827 एवढ्या घरांची विक्री या कालावधीमध्ये झाली. स्वस्त घरांच्या तुलनेत महागड्या घरांची विक्री तिप्पट झाली आहे. त्यामूळे सध्या महागड्या घरांना जास्त मागणी असल्याचं दिसतय..

आनंदाची बातमी! नवी मुंबईत सिडको काढणार 5000 स्वस्त घरांची लॉटरी, येथे क्लिक करून पहा सिडकोची ही घरे कुठे असणार?

Leave a Comment