मुंबईत सायन याठिकाणी म्हाडाचे 1 bhk फ्लॅट, सर्वसामान्य लोकांसाठी हजारो घरे, पहा कामाची बातमी..!

1 bhk Home Mumbai : शीव कोळीवाडा याठिकाणी असलेल्या गुरू तेगबहादूर नगरामधील सरदार नगर या एकेकाळी असलेल्या निर्वासितांच्या 11 एकरवरच्या वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी’कडून करण्याचा महत्वाचा असा प्रस्ताव म्हाडाने (Mhada) सरकारकडे पाठविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2 हजार 930 एवढ्या कोटींच्या असलेल्या या प्रकल्पात एकही रुपया खर्च न करता म्हाडाला सामान्यांकरिता 1 हजारांपेक्षा जास्त घरे (1 bhk flat) उपलब्ध होणार आहेत. या पुनर्विकासासाठी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निविदा काढण्यासाठी म्हाडा प्रयत्न करत आहे.

सध्या म्हाडाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्या कारणाने बीडीडी चाळ प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्विकास शक्य नसल्याची भूमिका म्हाडा कडून घेण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडाला सर्वात जास्त घरे तसेच अधिमूल्य देणाऱ्या विकासकाची (Developer) निवड करण्याचे महत्वाचे असे धोरण म्हाडाकडून अवलंबण्यात आले आहे. आता त्यानुसार ‘कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट’ची नियुक्ती करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ह्या आधी मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास या पद्धतीनुसार करण्याचे ठरविण्यात आले आहे आणि त्यानुसार निविदा देखील जारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अंतिम ठरलेल्या एलअॅण्डटी किंवा अदानी समूह यांच्यापैकी एकाची निवड केली जाणार आहे. जीटीबी नगर याठिकाणी असलेल्या या वसाहतीमध्ये 25 इमारती आहे आणि त्यामध्ये जवळपास 1200 एवढ्या रहिवाशांचे वास्तव्य आहे. तसेच उर्वरित असलेल्या मोकळ्या जागांवर 200 झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. पालिकेकडून या सर्व इमारती धोकादायक असल्याच्या घोषित केल्यानंतर पाडून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या वसाहतीचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी म्हाडाकडे (Mhada) सोपविण्यात आली आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

वास्तुरचनाकारांकडून मिळालेल्या अहवालानुसार, कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत पुनर्विकास करता येणार.. विकास नियंत्रण नियमावली 33(9) अन्वये चार चटईक्षेत्रफळ तसेच फंजीबल अशा पद्धतीने कमीत कमी 4.5 एवढे चटईक्षेत्रफळ उपलब्ध होईल. आणि सर्व रहिवाशांना 635 एवढ्या चौरस फुटाचे घर (Square foot Flat) मिळेल. चार वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्याकडून सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

आनंदाची बातमी! नवी मुंबईत सिडको काढणार 5000 स्वस्त घरांची लॉटरी, येथे क्लिक करून पहा सिडकोची ही घरे कुठे असणार?

Leave a Comment