मुंबईत फक्त एवढ्या लाखात 1 बीएचके घर, हजारो घरे स्वस्तात मिळणार?

1 bhk flat in Mumbai  : मुंबईमधील रिअल इस्टेट ही बाजारपेठ देशामधील सर्वात महागडी बाजारपेठ समजली जाते. आणि हे खरं सुद्धा आहे. मुंबई आणि नजीकच्या भागात वन आणि टू बीएचके फ्लॅट देखील  (1 bhk flat in Mumbai) कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीमध्ये विकला जातो. अशी परिस्थिती असताना, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितले की तुम्हाला याठिकाणी फक्त 9 लाख रुपयांमध्ये सुद्धा फ्लॅट मिळेल, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे. खरं म्हणजे, महाराष्ट्र सरकार तुम्हाला फक्त 9 लाख रुपयांमध्ये घर खरेदी करण्याची मोठी संधी देत ​​आहे. याकरिता अर्ज भरण्यासाठी लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घरांची लॉटरी (Housing Lottery) काढली जाणार आहे. यामध्ये यशस्वी ठरणाऱ्या अर्जदारांना 1 बीएचके फ्लॅट (1 bhk flat for sale in Mumbai) कमी किमतीमध्ये मिळणार आहे. ही घरे म्हाडाच्या मालकीचे आहे.

येथे वाचा – याठिकाणी प्लॉट, घर आणि फ्लॅट खरेदी करा; भविष्यात दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता..!

कशी आहे योजना (Housing Scheme)

म्हाडाने परवडणाऱ्या घरांची योजना (Affordable housing scheme) जाहीर केली आहे. म्हाडाची ही घरे मुंबई आणि ठाणे या भागात आहे. या घरांची किंमत 9 लाख ते 49 लाख रुपये या दरम्यान आहे. आणि या घरांची विक्री ही लॉटरी पद्धतीनेच करण्यात येणार आहे.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

पीएम आवास योजनेमध्ये देखील फ्लॅट । 1 bhk in kandivali

म्हाडाच्या च्या या योजनेमध्ये जवळपास 1 हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. यासाठी तेच लोक अर्ज करू शकणार, जे लोक केंद्र सरकारच्या या योजनेकरिता पात्र असणार. त्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे फक्त 3 ते 6 लाख असावे लागणार आहे.

घराचे क्षेत्रफळ आणि किंमत (Flat Price)

म्हाडाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार ही घरे मुंबईच्या जवळील भागामध्ये आहे. यात ठाणे, कल्याण, वसई, विरार, मुंब्रा आणि टिटवाळा या ठिकाणे आहेत. तसेच अजून काही भागात देखील ही घरे आहेत. या घरांची किंमत 9 लाख रुपयांपासून ते 49 लाख रुपयांपर्यंत अशी आहे. मुंबई नजीक विक्री होणार्‍या या घरांपैकी सर्वात स्वस्त असलेल्या अपार्टमेंटची किंमत 9.89 लाख रुपये एवढी आहे. हे अपार्टमेंट 258 चौरस फूट एवढे आहे. या योजनेमध्ये असलेली सर्वात महागडी घरे वसईमध्ये (Expensive House in Vasai) आहेत. ही घरे 667 स्क्वेअर फूट एवढ्या क्षेत्रफळावर बांधण्यात आली आहे. आणि त्यांची किंमत 49.91 लाख रुपये एवढी आहे.

Leave a Comment