मुंबईकरांसाठी खुशखबर! म्हाडा काढणार एक लाख घरांची सोडत; फक्त एवढ्या किमतीत 1 BHK फ्लॅट;

मुंबई :  राज्यभरातील सर्वसामान्य नागरिकांकरिता कमीत कमी दोन लाख घरे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच माडाने हाती घेतला आहे. म्हाडा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो म्हाडा ही अगदी स्वस्तामध्ये घरे उपलब्ध करून देणारी संस्था आहे (1 Bhk Flat in Mumbai). त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकरिता जास्तीत जास्त घरे कशी उपलब्ध करून देता येईल या दिशेने माडाचे धोरण काम करत आहे. अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

म्हाडा महामंडळअंतर्गत मुंबई विभागामध्ये तब्बल एक लाख घरे वितरित केले जातील. अशी महत्वपूर्ण माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. त्यामुळे आता घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वच सर्वसामान्य नागरिकांना या बातमीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास चार हजार चौरस मीटर पेक्षाही अधिक घर बांधण्याचा प्रकल्प उभा केला जाणार असून त्यामधील 20% घरे म्हाडाला देणे बंधनकारक असणार आहे (mhada lottery registration). या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना घर अगदी स्वस्तामध्ये उपलब्ध होणार आहे. लॉटरी प्रक्रियेद्वारे घर वाटप केले जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.

मागील काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या मुंबई विभागाने तब्बल 4,082 घरांची लॉटरी प्रक्रिया पार पाडली. पहिल्यांदाच कोणत्याही मानवी हाताळणीशिवाय ही लॉटरी प्रक्रिया जाहीर झाली. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिली की, म्हाडाने आता इथून पुढे घरांचा साठा वाढवण्यावर लक्ष द्यावे (mumbai mhada lottery 2023). या पार्श्वभूमीवर धोरण आखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाने हाती घेतला आहे. आता म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना घर उपलब्ध होतील अशी सर्वांची आशा आहे. यामुळे माडाने सुद्धा जास्तीत जास्त घरांचे बांधकाम करावे. त्या दिशेने आता काम सुद्धा सुरू झाले. असून म्हाडाच्या विविध योजना अंतर्गत जास्तीत जास्त घर कशा प्रकारे बांधली जातील यावर माडाने भर दिला आहे. अशी माहिती जयस्वाल यांनी सांगितली.

म्हाडा अंतर्गत अभ्युदयनगर म्हणजेच काळाचौकी, सोबतच मोतीलाल नगर, आदर्श नगर म्हणजेच वरळी व वांद्रे यांनी पुनर्विकासा अंतर्गत संपूर्ण घरांचा साठा वाढवण्याकरिता एजन्सी मार्फत व बांधकाम विभागामार्फत विविध पुनर्विकास योजना राबवल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त घर कशाप्रकारे उपलब्ध होतील या दिशेने म्हाडाने काम हाती घेतले आहे (Upcoming MHADA lottery 2023 Mumbai Dates). बीडीडी चाळ पुनर्विकास या प्रशासनाच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून माढा लवकरच पुनर्वसन इमारती बांधणार असून रहिवाशांच्या ताब्यात सुद्धा देणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम जोमात चालू असून हे काम जलद गतीने पूर्ण होईल.

म्हाडाचे कोकण मंडळ हे विजयी दशमीच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा नव्याने तब्बल 5,000 घरांची लॉटरी प्रक्रिया जाहीर करेल. असे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून म्हाडाच्या मंडळांनी यासाठी वेळापत्रक सुद्धा तयार केले आहे. आगामी सोडती मध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व घरांच्या किमती सोबत इतर माहिती आपल्यासमोर आली आहे. या सोडतीमध्ये घरांच्या ज्या काही किमती असतील त्या मुंबई महामंडळाच्या सोडती पेक्षाही कमी असणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार या सोडतीमध्ये सहभागी होणाऱ्या घरांची किंमत कमीत कमी नऊ लाख 89 हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. ते जास्तीत जास्त 42 लाखांपर्यंत असेल. सर्वात स्वस्त घरे ही वसईत असतील आणि विरार मध्ये महाग घरे असतील.

Leave a Comment