म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना काय लक्षात ठेवावे?
(1) सर्वात महत्वाचे म्हणजे म्हाडासाठी अर्ज करत असताना तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे.
(2) रहिवाशी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे
(3) पॅन कार्ड आवश्यक
(4) आपण पगारदार असायला पाहिजे
(5) यापूर्वी तुम्ही म्हाडाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही..
(6) मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर अर्ज करता येतो. त्यासाठी सविस्तर माहिती पहा
जर तुमचे मासिक उत्पन्न 25 हजार ते 50 हजार या दरम्यान असेल तर तुम्हाला LIG फ्लॅटसाठी अर्ज करता येतो.
जर तुमचे मासिक उत्पन्न 50 हजार ते 75 हजार यादरम्यान असेल तर तुम्हाला MIG या फ्लॅटसाठी अर्ज करता येतो.
जर का तुमचे मासिक उत्पन्न 75 हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला HIG या फ्लॅटसाठी अर्ज करता येईल.