या बॅंका देतात सर्वात स्वस्त होम लोन

एका प्रसिद्ध वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सर्वात स्वस्त होम लोन देणार्‍या बॅंकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्वात पुढे आहे. या बँकेत सर्वात स्वस्त होम लोन मिळते. जर तुम्ही 20 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाख रुपये होम लोन घेतले तर त्याला 7.20 ते 8.70 या दरम्यान व्याजदर आहे. आपल्या अधिक माहितीनुसार या व्याजदराने एवढ्या लोन वर तुम्हाला 23,600 ते 26,400 असा मासिक हप्ता पडेल..

येथे वाचा – तुम्हालाही मिळेल म्हाडाचे घर, फक्त घरासाठी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा..!

त्यानंतर भारतीय स्टेट बँक कमी व्याजदरात होम लोन देते. या बॅंकेचा व्याजदर 8.4 ते 9.05 या दरम्यान आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा व्याजदर 8.30 ते 9.85 यादरम्यान आहे.