आता घर घेताना पैशाची चिंता सोडा; या पाच बॅंकांमध्ये मिळत आहे स्वस्त होम लोन, संधीचा फायदा घ्या..!

Home Loan : तुम्ही अलीकडच्या काळात होम लोन (Home Loan) घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अलीकडे काही बॅंका कमी व्याजदरात होम लोन देत आहे, त्यामुळे आता नवीन घर घेण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे.

होम लोनचे व्‍याजदर ग्राहकाचा सिबिल स्कोअर (CIBIL Score), पगार आणि नोकरी तसेच कर्जाचा कालावधी यासह बर्‍याच घटकांवर अवलंबून असतात. होम लोनवर आकारले जाणारे व्याज हे आरबीआयच्या (RBI) निर्णयावर अवलंबून राहते. पण बर्‍याच बँकांच्या होम लोनच्या व्याजदरामध्ये बरीच तफावत दिसते. सध्या कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देणार्‍या कोणत्या बँका आहे याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत..

आता करा म्हाडाच्या स्वस्त घरासाठी अर्ज; येथे क्लिक करून पहा अर्ज प्रक्रिया?

HDFC Bank : खासगीक्षेत्रा मधील सर्वात मोठी बँक HDFC ने आपल्या ग्राहकांना होमलोनवर कमीत कमी 8.50 टक्क्यांपासून ते जास्तीत जास्त 9.40 टक्क्यांपर्यंतचं व्याज घेते.

Indian Bank : देशामधील सार्वजनिक क्षेत्रातील बँक Indian Bank होमलोनवर आपल्या ग्राहकांकडून 8.50 टक्के ते 9.90 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर आकारते.

Punjab National Bank : जर तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेतून होम लोन (Home Loan) घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 8.50 टक्के ते कमाल 10.10 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागेल.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Indusind Bank : इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना होम लोनवर कमीत कमी 8.50 टक्के ते जास्तीत जास्त 10.55 टक्क्यांपर्यंत व्याज आकारते.

Bank of India : बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना होम लोनवर कमीत कमी 8.50 टक्के ते जास्तीत जास्त 10.60 एवढ्या टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करते.

सिबिल स्कोअर म्हणजे काय? (What is CIBIL Score?
सिबिल स्कोअर (CIBIL Score) हा 300 ते 900 यादरम्यान असतो. ग्राहकाचा सिबिल स्कोअर जेवढा जास्त असेल तेवढ्या कमी व्याजदरामध्ये तुम्हाला कर्ज मिळेल. देशामधील बहुतांश बँकांनी लोन देण्यासाठी कमीत कमी सिबिल स्कोर 685 एवढा निश्चित केला आहे.

काय सांगता! सामान्यांसाठी दोन लाख घरे; आता स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment