म्हाडाचे घर घ्यायचे का? पहा लॉटरी संदर्भात महत्वाची अपडेट..!

मुंबई : म्हाडाद्वारे ठाणे शहर (1 bhk flat in thane) आणि जिल्हा तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग याठिकाणी असलेल्या विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 311 एवढ्या सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा गो लाईव्ह कार्यक्रमाचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी रोजी करण्यात आला. (Various housing schemes in Mumbai and Thane by MHADA)..

वांद्रे पूर्व (Bandra, Mumbai) येथील सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमांतर्गत संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली की, शासनाच्या समाजामधील शेवटच्या घटकाला परवडणाऱ्या दरामध्ये घरे (Affordable flat in Mumbai) मिळावी या उद्दिष्टपूर्ती प्रती म्हाडा (Mhada) कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरामध्ये राज्यात जास्तीत जास्त गृहबांधनीचे प्रकल्प (Housing Project) उभारणीचे नियोजन सुरू आहे. कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संगणकीय सोडत ही प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक असून यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपास वाव नाही.

आता करा म्हाडाच्या स्वस्त घरासाठी अर्ज; येथे क्लिक करून पहा अर्ज प्रक्रिया?

तसेच सदनिकांच्या विक्री व्यवहारात कोणत्याही व्यक्तीच्या किंवा मध्यस्थांच्या खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका. महत्त्वाचं म्हणजे मंडळाकडून कोणालाही सल्लागार व प्रॉपर्टी एजेंट तसेच त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्ती म्हणून नेमलेले नाही, अशा प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास किंवा फसवणुक झाल्यास कोकण मंडळ अथवा म्हाडा याला जबाबदार राहणार नाही, ही महत्वाची बाब नागरिकांनी लक्षात घ्यावी. (1 bhk flat Mumbai)..

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

नूतन संगणकीय प्रणालीद्वारे सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवणे नागरिकांना सुलभ-सोपे झाले आहे. कारण आता अर्जदार घरी बसून किंवा कुठूनही सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतात. यात नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे तसेच ऑनलाइन पेमेंट अशा सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अर्जदारांच्या सोयीसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment