ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी फक्त 11 लाखात घर; ताबडतोब असा करा अर्ज..!

1 BHK Flat in Thane : तुम्हाला ठाणे शहरात स्वस्तात घर (1 BHK Flat in Thane) घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता ठाण्यात म्हाडाच्या स्वस्त घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ठाण्यात स्वस्त किती घरे आहेत? त्यांची किंमत आणि अनामत रक्कम यासंदर्भात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

1 BHK Flat in Thane

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे (Thane), पालघर, रायगड याठिकाणी म्हाडाच्या बांधण्यात आलेल्या 5 हजार 311 एवढ्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. कोकण मंडळाच्या घरांच्या या सोडतीत अर्जदार व्यक्ती कुठूनही भाग घेऊ शकतो. अर्जदारांच्या सोईसाठी Mhada Housing Lottery System या ॲप वर बर्‍याच सुविधा देण्यात आल्या आहे. त्यात नोंदणीकरण आणि कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा देखील आहे.

आता करा म्हाडाच्या स्वस्त घरासाठी अर्ज; येथे क्लिक करून पहा अर्ज प्रक्रिया?

ठाण्यातील घरे आणि त्यांच्या किंमती

ठाण्यात सर्व साधारण उत्पन्न गटासाठी 426 घरे उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील ही घरे 1 BHK आहे. (1 BHK Flat in Thane). जर या घरांच्या किंमती पाहिल्या तर नक्कीच सर्व सामान्यांना दिलासा मिळेल अशा आहे. ठाण्यातील या घरांची किंमत फक्त 11 लाखांपासून सुरू होत आहे. येथील घरांच्या किंमती 11 लाख ते 27 लाख या दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. पण पार्किंग चार्ज, सोसायटी चार्ज आणि इलेक्ट्रिसिटी चार्ज पकडता या घरांची किंमत काही प्रमाणात वाढू शकते. 11 लाखाचे घर 15 ते 17 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. म्हणजे हा खर्च पकडून 11 लाखाचे घर तुम्हाला 15 ते 20 लाखांच्या किमतीत मिळू शकते.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

कोकण मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या 5 हजार 311 घरांच्या सोडतीची लिंक 16 ऑक्टोबर पर्यंत सुरू असेल. आणि अर्जदारांना 18 ऑक्टोबर पर्यंत अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता येईल. अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) 5 हजार, LIG गटासाठी 10 हजार तर MIG घटकासाठी 15 हजार अशी आहे.

आता करा म्हाडाच्या स्वस्त घरासाठी अर्ज; येथे क्लिक करून पहा अर्ज प्रक्रिया?

ज्या अर्जदारांना वेळेत सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य होईल तेच या प्रणालीच्या माध्यमातून पात्र ठरविले जाणार. सोडतीकरिता पात्र अर्जांची अंतिम यादी ही 3 नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी 6 वाजेला म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. 7 नोव्हेंबर या दिवशी सकाळी 11 वाजेला पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर करण्यात येणार आहे. मग नंतर अर्जदार व्यक्तींना सोडतीचा निकाल त्यांच्या मोबाइलवर एसएमएस, ई-मेल तसेच ॲपद्वारे कळवण्यात येईल. आणि त्याच दिवशी सायंकाळपासून यशस्वी असलेल्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Leave a Comment