आनंदाची बातमी : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सामान्यांसाठी सिडकोची 171 घरे, या दिवसापासून करू शकता अर्ज..!

Cidco Flats Navi Mumbai : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून ‘नैना’ क्षेत्रामध्ये सिडकोकडून गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर 171 घरे (Cidco Flats Navi Mumbai) विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी 17 तसेच अल्प उत्पन्न गट करिता 164 एवढ्या घरांचा समावेश आहे. अर्जदाराला या घरांसाठी 21 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कालवधीमध्ये ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आणि संगणकीय सोडत 8 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

Cidco Flats Navi Mumbai

नैना प्रकल्पाच्या मंजूर असलेल्या डीसीपीआरनुसार 4 हजार चौ.मी. किंवा त्यापेक्षाही जास्त क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत (Housing Scheme) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटक व अल्प उत्पन्न गटामधील घरे विकसित करण्यासाठीची तरतूद आहे. त्यानुसार भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20 टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारा घटक व अल्प उत्पन्न असलेल्या गटांच्या सदनिकांसाठी खासगी विकसकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता म्हाडाचे घर फक्त 9 लाखात; म्हाडाचे घर तुमच्या बजेटमध्ये, येथे क्लिक करून पहा कुठे आहे ही घरे?

या तरतुदीच्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याच्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या 7 विकसकांनी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती सिडकोकडे सादर केली आहे. या योजनेअंतर्गत अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याकरिता ऑनलाइन नोंदणी 21 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. ऑनलाइन शुल्कचा भरणा 29 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 2 नोव्हेंबरला, तर अंतिम 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी फक्त 11 लाखात घर; ताबडतोब असा करा अर्ज, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment