पुन्हा एकदा मोठी संधी! नवी मुंबईत आता फक्त 10 लाखात घर; पहा ठिकाण, किंमती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती..!

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) परिसरात 4 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर गृहनिर्माण प्रकल्प (Housing Project) बांधण्यात आलेल्या 7 खासगी बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यामूळे सिडको महामंडळाने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या प्रकल्पामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटामधील 171 घरांच्या (Cidco Flats Navi Mumbai) विक्रीसाठीचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ही सोडत प्रक्रिया 21 सप्टेंबर पासून सुरू होईल. या घरांसाठी अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर पासून सुरू होणार असून 18 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. पोयंजे, आकुर्ली, विहिघर आणि चिंध्रण या गावांमधील हे गृहप्रकल्पाचे बांधकाम (Housing Construction) पूर्ण झाले आहे आणि या प्रकल्पामधील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकरिता 7 आणि अल्प उत्पन्न गटांकरिता 164 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

याठिकाणी मिळणार 10 लाखात घर (Cidco Flats Navi Mumbai)

या घरांचे क्षेत्रफळ 27 ते 50 चौरस मीटर असे आहे (Cidco Flats Navi Mumbai). महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या किंमती देखील सामान्य लोकांना परवडणाऱ्या असतील. सिडको मंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार पोयंजे येथे असलेले घर 10 लाख रुपयांना तर चिंध्रण परिसरामधील घर 24 लाख रुपयांपर्यंत विक्री केली जाणार आहेत.

आता म्हाडाचे घर फक्त 9 लाखात; म्हाडाचे घर तुमच्या बजेटमध्ये, येथे क्लिक करून पहा कुठे आहे ही घरे?

या सोडतीत सहभाग घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांना फक्त 4 हजार रुपयांत सिडको मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक अर्जदार lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सिडको मंडळाकडून या सोडतीत सुलभकाचे काम करण्यात येणार असून लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर थेट संबंधित खासगी विकसक आणि लाभार्थी यांच्यात व्यवहार होणार आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे, अशा प्रकारचा सूर पनवेलमधील ग्रामीण भागामध्ये सूरु असताना सिडको मंडळाकडून नैना प्रकल्प क्षेत्रात खासगी विकासकांकडून बांधण्यात आलेल्या घरांपैकी 20 टक्के घरांच्या विक्रीसाठी पाऊले उचलण्यात आली आहे.

नैनाच्या विकास नियमावलीनुसार 4 हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्‍या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटामधील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7 खासगी विकासकांनी नैना प्रकल्पामध्ये एकूण क्षेत्रफळापैकी 20 टक्के जागा ही आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांच्या घरांसाठी नैना प्रकल्प परिसरात तयार केली आहे.

ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी फक्त 11 लाखात घर; ताबडतोब असा करा अर्ज, येथे क्लिक करून पहा माहिती..

Leave a Comment