मुंबईत चक्क 323 स्क्वेअर फुटामध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत पाहिली का? असं फक्त मुंबईतच होऊ शकतं..

2 BHK Flat Mumbai : मुंबईत घर विकत घेण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. मुंबई नगरीत आपले सुद्धा हक्काचे घर पाहिजे असं अनेकांना वाटत असतं. मुंबई दाटीवाटीचे शहर असल्याने इथे मोकळ्या जागेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईत मोठ मोठ्या इमारती बांधल्या जातात. आणि या इमारतींमध्ये फ्लॅट घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. मुंबईतील या इमारतींमध्ये फ्लॅटच्या किंमती देखील भरमसाठ आहे. छोट्याश्या घरासाठी देखील मुंबईत लाखो व कोटींपर्यंत पैसे मोजावे लागतात. कमी पैशात घर घ्यायचे असेल तर मुंबईबाहेर म्हणजेच ठाणे, नवी मुंबई (Navi Mumbai) आणि विरार या भागात घर घ्यावे लागते. म्हणून मध्यमवर्गीय लोक घर घ्यायचं असेल तर थेट मुंबईबाहेरच घर घेतात. मुंबईत घर घ्यायचे असेल तर छोट्या फ्लॅटसाठी किती पैसे मोजावे लागतात, याची माहिती देणारा एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात घर विकत घेणे तर सोडाच भाड्याने घेणं देखील खिशाला परवडत नाही. देशात महागड्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो. इथे जागेची कमतरता असल्याने घरे देखील छोट्या आकाराची बांधली जातात. घरे छोटी असली तरी मात्र त्यांची किंमत डोळ्यात पाणी आणणारी आहे. मुंबईत चक्क 323 स्वेअर फूटमध्ये 2 बीएचके फ्लॅट (2 BHK Flat Mumbai) बांधण्यात आला आहे. या फ्लॅटची किंमत देखील डोळ्यात पाणी आणणारी आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल 75 लाख एवढी आहे. त्यामुळे हा फ्लॅट नेमका कसा असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा फ्लॅट मुंबईतील कांदिवली (2 BHK Flat Kandivali) परिसरात आहे. हा फ्लॅट पाहिल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल.

खुशखबर! मुंबईत सिडकोचे घर फक्त 22 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती

हा फ्लॅट 23 मजली इमारतीत असून हा कॉम्पॅक्ट 2 BHK फ्लॅट आहे. पण त्याला चांगल्या पद्धतीने बांधण्यात आले आहे. ही माहिती एका रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सरने व्हिडिओतून दिली आहे. या इन्फ्लुएन्सरच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल पण तुमचे बजेट 1 BHK फ्लॅट इतकेच असेल तर तुम्ही हा फ्लॅट खरेदी करू शकता. या फ्लॅटमध्ये दोन छोटे बेडरूम, मायक्रो बाथरुम आणि कमी जागेत लिव्हिंग रुम व किचनही तयार करण्यात आले आहे.

या फ्लॅट मध्ये आंघोळ नेमकी कुठे करायची हे पाहण्यासाठी 3 ते 4 वेळा हा व्हिडिओ पाहिला असल्याचं एका युजरने लिहिले आहे.

येथे वाचा – मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!

Leave a Comment