दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या घरांसाठी वाढली मुदत वाढ;

Mhada lottery registration 2023: म्हाडाच्या पुणे विभागाअंतर्गत काढण्यात आलेल्या जवळपास 6000 घरांच्या सोडतीला आता आणखी एकदा मुदतवाढ दिली आहे. अर्जदारांना कागदपत्रांची जुळवा जुळवा अगदी व्यवस्थित रित्या करता यावी ही बाब लक्षात घेत 30 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ केली आहे. या सोडतीचा जो काही लकी ड्रॉ असेल तो दिनांक 21 नोव्हेंबर रोजी काढला जाईल (2 Bhk Flat in Pune). अर्ज करणाऱ्या व्यक्तींचा आतापर्यंतच्या आकडा बघितला तर 45000 इतका आहे.

म्हाडा अंतर्गत पुणे विभागामधील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये देखील 5,863 घरांची सोडत काढण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याप्रमाणे 27 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती (mhada lottery pune). परंतु अर्ज करणाऱ्या व्यक्तींना अर्जासोबत इतर आवश्यक कागदपत्रांसोबतच रहिवासी दाखला सादर करणे बंधनकारक होते. त्यामुळे पूर्ण अर्ज या ठिकाणी स्वीकारले जात होते.

खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात तब्बल 16 हजार परवडणारी घरे..आता स्वस्तात मिळणार घर, कसा घ्याल लाभ?

अनेक अर्ज करणाऱ्या व्यक्तींना रहिवासी दाखला हा त्यांच्या संबंधित तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून वेळेमध्ये उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळेच अनेक अर्ज करणार्‍या व्यक्तींकडून, तसेच विविध संघटनांकडून या सोडतीची मुदत वाढवावी अशी मागणी सातत्याने म्हाडाच्या मंडळाकडे केली जात होती. त्याप्रमाणे जी काही मुदत असेल ती 20 ऑक्टोबर रोजी निश्चित केली. परंतु त्यामध्ये देखील आता आणखी वाढ केली आहे आणि 30 ऑक्टोंबर ही तारीख निश्चित केली आहे.

काय सांगता ! ही एक आयडिया घर खरेदी करताना वाचवेल लाखो रुपये..पहा आणि स्वतःचा फायदा करा..!

अर्जदारांना जी काही अनामत रक्कम भरायची आहे त्याची मुदत 30 ऑक्टोंबर पर्यंतची आहे. सोडतीसाठी जी काही स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी असेल ती 8 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच दिनांक 20 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल. यशस्वी तसेच प्रतीक्षा यादी मधील अर्ज करणाऱ्या व्यक्तींची नावेही म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध केले जातील..

Leave a Comment