अरे वा! मुंबईतील सर्वात स्वस्त 2 BHK भाड्याचे घर; महिन्याचे भाडे फक्त एवढेच, पहा या पॉश भागात आहे हे घर..!

2 BHK Flat Rent Mumbai : मुंबईत घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य लोकांना भाड्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जर मुंबईत वन बीएचके घर (1 BHK Flat Mumbai) खरेदी करायचा विचार केला तर त्याची किंमत 40 लाख ते 60 लाख रुपये या दरम्यान आहे. सामान्य लोकांकडे एवढे बजेट नसल्याने ते भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. पण मुंबई या महानगरात लोकांना घरभाड्यासाठी देखील मोठे पैसे मोजावे लागतात. मुंबईकरांना महिन्याला मिळणार्‍या पगाराचा मोठा हिस्सा घर भाड्यात द्यावा लागतो. दिल्ली- मुंबईच नाही तर इतर छोट्या शहरांमध्ये देखील महिन्याचे 25 ते 30 हजार रुपये घर भाडे आहे. पण आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबईत 2 बीएचके फ्लॅटचे भाडे (2 BHK flat rent Mumbai) फक्त 4300 रुपये एवढे आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरं आहे. मुंबईत 2 बीएचके घर, तेही स्वस्त भाड्यावर.. (2 BHK Flat Mumbai)

काय सांगता! फक्त 20 हजारात 2 BHK घरासाठी मिळेल फर्निचर, येथे क्लिक करून पहा कुठे मिळणार?

मनीकंट्रोलच्या एका रीपोर्टमध्ये मुंबईमधील या सर्वात स्वस्त भाड्याच्या अपार्टमेंटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट मुंबईच्या मध्यभागी अत्यंत पॉश भागामध्ये आहे. (2 BHK Flat Mumbai). मुंबईतील अतिशय पॉश भागात तुम्हाला भाड्याने 2 BHK फ्लॅट फक्त 4300 रुपयांमध्ये मिळाला तर तुमचा किती फायदा होईल.. चला जाणून घेऊया या फ्लॅट बद्दल..

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

मुंबईत याठिकाणी आहे हा फ्लॅट..

मुंबईत सर्वात कमी भाडे असणारा हा 2 BHK फ्लॅट (2 BHK flat Mumbai) दादरमध्ये आहे. हे घर पारशी कॉलनीत असून ही पारशी कॉलनी जगातील सर्वात मोठी कॉलनी आहे. 1300 स्क्वेअर फूट एवढ्या आकाराच्या या 2 BHK घराचे भाडे फक्त 4300 रुपये प्रति महिना आहे. पारसी कॉलनी हे ठिकाण दक्षिण मुंबईतील एक विकसित ठिकाण असून मुंबईतील प्रमुख ठिकाण मानले जाते. मुंबईतील वडाळा रोड आणि दादर रेल्वे स्टेशनपासून हा फ्लॅट हाकेच्या अंतरावर आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून फक्त 14 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा; मिळेल खूपच स्वस्तात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

या फ्लॅटचे भाडे कमी असण्याचे कारण काय? 

हा फ्लॅट पारशी पंचायतीचा आहे आणि ही पारशी पंचायत नफा कमावणारी संस्था नसून गरजू लोकांना मदत करणारी संस्था आहे, त्यामुळे या फ्लॅटचे भाडे खूप कमी आहे.

Leave a Comment