सामान्यांसाठी 30 हजार घरे; आता पंतप्रधान करणार एवढ्या घरांच्या चाव्या वाटप, पहा कोणत्या जिल्ह्यात आहे ही घरे?

1 BHK Home : आपल्या राज्यात आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला गृहप्रकल्प (Housing Project) उभारण्यात आला आहे. हा गृहप्रकल्प आशिया खंडात सर्वात मोठा असल्याने नेमका हा प्रकल्प कसा असेल असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडणार. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून याचे काम होत असून हा प्रकल्प रे नगर फेडरेशनने उभारला आहे. यात तब्बल 30 हजार घरांचा समावेश आहे. ही घरे वन बीएचके (1 BHK Home) स्वरूपाची आहे. हा गृहप्रकल्प 365 एकर एवढ्या मैदानात पसरलेला असून यात 834 इमारती आहेत. आता या 30 हजार घरांपैकी 15 हजार घरांचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आता 15 हजार घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पातील घरांची मालकी ही महिलांच्या नावाने असणार आहे.

येथे वाचा – आता 1 BHK घरासाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

या गृह प्रकल्पात मिळतील या सुविधा

महत्त्वाचं म्हणजे या गृह प्रकल्पात गरजेच्या सुविधा देखील मिळणार आहेत. यात योगा सेंटर, क्रीडांगण, आरोग्य केंद्र, 6 प्राथमिक शाळा, 24 अंगणवाडी, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि विजेचे उपकेंद्र असणार आहेत. या गृह प्रकल्पात 24 तास पाणी आणि वीज उपलब्ध असेल. यातील 30 हजार घरांपैकी 15 हजार घरांच्या चावीचे वाटप पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार आहे.

घराची किंमत कितीही असो, घर तर घेणारच… मुंबई शहरात घर खरेदी जोरात, मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर..!

कुठे आहे हा गृहप्रकल्प?

हा गृहप्रकल्प सोलापूरमध्ये उभारण्यात आला आहे. सोलापुरात वेगवेगळ्या क्षेत्रात हजारो कामगार काम करतात. गरिबीमूळे या कामगारांना कच्च्या घरांमध्ये तसेच झोपडपट्टीमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता या सामान्य कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घराचे स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळत आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment