सिडकोचे 35 लाखाचे घर अवघ्या 27 लाखात; पहा कुठल्या घरांच्या किमती कमी झाल्या..

Cidco Flats Navi Mumbai : सध्याच्या काळात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यांसारख्या मोठ्या शहरात हक्काचे घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करणे मोठे खर्चिक काम बनले आहे. दिवसेंदिवस घरांच्या किमतीत वाढ होत असल्याने घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबई आणि नवी मुंबईत घर (2 BHK Flats Navi Mumbai) घेणे मोठे अवघड झाले आहे. अशी परिस्थिती असताना म्हाडा-सिडकोकडून मात्र कमी किमतीत घरे उपलब्ध करून दिले जातात.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

35 लाखाचे घर अवघ्या 27 लाखात (Cidco Flats)

आजपर्यंत नवी मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांचे कमी पैशात घर घेण्याचे स्वप्न सिडकोने पूर्ण केले आहेत. सिडकोकडून विकसित करण्यात येणार्‍या गृहप्रकल्पांना नागरिक चांगला प्रतिसाद देत असतात. कारण स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोकडून वारंवार महत्वाचे निर्णय घेतले जातात. अलीकडेच सिडकोने स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 35 लाखाचे घर अवघ्या 27 लाखात मिळणार आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

कुठल्या घरांच्या किंमती झाल्या कमी?

परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणार्‍या सिडकोने एका गृह प्रकल्पातील घरांच्या किमती तब्बल 6 लाख रुपयांनी कमी केल्या आहे. त्यात पुन्हा या घरांसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळत असल्याने या घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहे. त्यामूळे सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईतील उलवे येथे असलेल्या बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळील सिडकोच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती कमी झाल्या आहेत. या गृह प्रकल्पातील घरांच्या किंमती जास्त असल्याने घरांच्या किंमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आता या घरांच्या किंमती 6 लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत. त्यात पुन्हा अडीच लाखाचे अनुदान देखील आहे. त्यामुळे 35 लाख 50 हजार रुपयांचे घर अवघ्या 27 लाखात उपलब्ध होत आहे.

काय सांगता! मुंबईत म्हाडाचे गाळे खरेदीसाठी मोठी झुंबड; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment