खुशखबर! म्हाडाच्या या घरांची 70 टक्के दुरुस्ती पूर्ण; दिवाळीनंतर एवढ्या लोकांना मिळणार घराची चावी..!

मुंबईत घर (2 bhk flat Mumbai) घेण्यासाठी सध्या चढाओढ सुरू झालेली दिसते. कारण अलीकडच्या काळात मुंबईत स्वतःचे घर खरेदी करण्याचा मोठा ट्रेंड बनला आहे. मुंबईत घर खरेदी करणे म्हणजे मोठी गोष्ट समजली जात आहे. मुंबईत वेगवेगळ्या किमतींमध्ये घरे उपलब्ध आहेत. मुंबईत वन बीएचके घर (1 bhk flat Mumbai) काही लाखात उपलब्ध आहे तर तर मुंबईतील टू बीएचके घर (2 bhk flat Mumbai) कोटीच्या घरात गेले आहे. किमती कशाही असल्या तरी लोक आपल्या बजेटनुसार घर खरेदी करताना दिसून येतात. म्हाडाकडून परवडणाऱ्या दरात घरे (Mhada Affordable Flats) उपलब्ध होत असल्याने लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. अलीकडेच मुंबईच्या पनवेलमधील म्हाडाच्या घरांची (Mhada Flats) 70 टक्के पूर्ण झाली असून दिवाळीनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये या घरांची संपूर्ण रक्कम भरलेल्या लोकांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे.

म्हाडाच्या मुंबई (Mhada Mumbai) मंडळाकडून पनवेलमध्ये असलेल्या कोन येथील गिरणी कामगारांच्या 2417 एवढ्या घरांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत येथील घरांच्या दुरुस्तीची कामे 70 टक्के एवढी पूर्ण झाली असून जवळपास 500 घरे वितरणासाठी सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे. दिवाळी संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या घरांची संपूर्ण रक्कम भरलेल्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे, त्यांना घराच्या चावीचे वाटप केले जाणार आहे.

काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल, येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबई मंडळाकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) भाडेतत्त्वावरील कोन येथील 2417 एवढ्या घरांसाठी वर्ष 2016 मध्ये सोडत काढण्यात आली होती. पण या सोडती मधील घरांचा ताबा आतापर्यंत या कामगारांना मिळाला नाहीये. काही कारणांमुळे तसेच दुरुस्तीच्या वादामुळे घरांचा ताबा देणे थांबले होते. पण आता हे दुरुस्तीचे काम मार्गी लावण्यात आले असून अलीकडेच या कामाची पाहणी गिरणी कामगार सनियंत्रण समितीकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत दुरुस्तीचे काम 70 टक्के एवढे काम पूर्ण झाल्याची महत्वाची माहिती समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली आहे. तर आतापर्यंत 500 घरांची दुरुस्ती पूर्ण झाली असून संबंधितांना दिवाळीच्या नंतर पाच ते सहा दिवसांमध्ये या घरांचा ताबा दिला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. घराची संपूर्ण रक्कम भरलेल्या 500 कामगारांना घराचा ताबा देण्यात येणार आहे.

खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment