म्हाडाचे घर घेण्याची संधी; आता म्हाडाच्या या घरांची विक्री होईपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरूच राहणार, पहा हे अर्जदार थेट विजेते म्हणून घोषित होणार..!

Mhada Flats Mumbai : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरारमधील बोळिंज येथे असलेल्या गृहप्रकल्पामधील (Housing Project) शिल्लक घरांची विक्री न झाल्याने कोकण मंडळाला चिंता सतावत होती. पण, आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पामधून वसई-विरारकरिता पाणी सोडायला सुरुवात केल्याने आता बोळिंज प्रकल्पामधील पाण्याची असलेली मोठी समस्या दूर होताना दिसत आहेत. त्यामुळे आता येथील म्हाडाची घरे (Mhada Flats) विकली जाण्याची शक्यता वाढली आहे.

Mhada Flats Mumbai

आता या घरांच्या विक्रीबाबत मंडळाच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर येथे असलेल्या 2 हजार 277 घरांची शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरूच असणार आहे. बोळिंजमधील जवळपास 10 हजारांच्या गृहप्रकल्पामधील 2 हजारांपेक्षा जास्त घरे ही बर्‍याचदा सोडत काढून आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेमध्ये समावेश करून देखील विकली जात नसल्यामूळे कोकण मंडळाची चिंता वाढली होती.

मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

पुढील महिन्यातील 13 डिसेंबर रोजी काढण्यात येत असलेल्या सोडतीमध्ये न विकलेल्या 2 हजार 278 एवढ्या घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांसाठीच्या अर्जस्वीकृतीची मुदत शुक्रवार रोजी रात्री 11.59 वाजता संपली आहे आणि या दरम्यान 2 हजार 278 एवढ्या घरांसाठी 454 एवढेच अर्ज अनामत रक्कमेसह जमा झालेले आहेत. त्यामुळे फक्त 454 एवढीच घरे विकली जाण्याची हमी मिळाली आहे. मंडळाकडून बोळिंज येथील घरांच्या अर्जविक्रीला 2 डिसेंबपर्यंत आणि आरटीजीएस, एनईएफटीच्या माध्यमातून अनामत रक्कम भरून अर्ज जमा करण्याकरिता 4 डिसेंबपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे….

त्यामुळे या घरांची अर्जविक्री प्रक्रिया सुरू राहणार आहे. महत्वाचं म्हणजे आता 4 डिसेंबरच्या नंतर देखील अर्जविक्री-स्वीकृती सुरूच राहणार असल्याची महत्वाची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांच्याकडून देण्यात आली आहे. बोळिंज प्रकल्पामध्ये असलेली पाण्याची समस्या दूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिलासा मिळाला असल्याची माहिती, मोरे यांनी दिली आहे.

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे; ही चांगली संधी गमावू नका, येथे क्लिक करून पहा बातमी..

या अर्जदारांना थेट विजेते म्हणून घोषित करण्यात येणार

बोळिंजमधील 2 हजार 278 एवढ्या घरांसाठी आतापर्यंत 454 एवढ्या इच्छुकांनी अनामत रक्कम भरून अर्ज जमा केले आहे. आता उर्वरित असलेल्या घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती सुरूच असणार आहे. महत्वाचं म्हणजे या 454 अर्जदारांना सोडतीमध्ये समाविष्ट न करता त्यांना थेट विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहे. इमारत आणि घर क्रमांक निश्चित करून या विजेत्यांना पुढील काही दिवसांमध्येच तात्पुरते देकारपत्र वितरित करून घरांचा ताबा देण्याचा असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment