15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्याचा कट रचला, सुरक्षा यंत्रणा अलर्ट..!

दिल्ली : स्वातंत्र्य दिवस आणि गणतंत्र दिवस हे दोन दिवस आपल्यासाठी व सर्व भारतीयांसाठी खुप महत्वाचे असतात. याच दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात. देशातील सर्वोच्च पदावर असलेले महत्वाचे व्यक्ती तिथे उपस्तीत असतात. अशा परिस्थितीत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असतो. त्यासाठी देशातील सर्वोच्च व महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी देशातील मोठ्या सुरक्षा यंत्रणांकडे असते. अलिकडेच देशातील गुप्तचर यंत्रणांना 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्याचा कट रचला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, फुटीरतावादी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ध्वज फडकावण्यापासून रोखण्याचा कट रचला आहे. त्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे.

गुप्तचर संस्थांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना ध्वज फडकावण्यापासून रोखण्यासाठी खालिस्तानी नेता गुरुपतवंत सिंह पन्नू यांनी शेतकऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना दिल्लीतील रस्ते ट्रॅक्टरने अडवण्याचे आवाहन केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काश्मीर, पंजाब, आसाम व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तिरंगा फडकवू नये असे पन्नूने सांगितले आहे.

दिल्लीत 15 ऑगस्टच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनादरम्यानच्या कालावधीसंदर्भात सुरक्षा यंत्रणांनी मोठा इशारा जारी केला आहे. अलर्टनुसार, दिल्लीमध्ये ‘ड्रोन जिहाद’ करून मोठा दहशतवादी कट रचला जाऊ शकतो. 15 ऑगस्टपूर्वी पाकिस्तानस्थित दहशतवादी दिल्लीला हादरवून टाकू शकतात. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी 15 ऑगस्टच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेतली आहे. अस्थाना यांनी एका बैठकीत म्हटले होते की, गेल्या 26 जानेवारीसारखी घटना पुन्हा घडू नये. 15 ऑगस्ट शांततापूर्ण असावा. कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम शांततेत पूर्ण झाले पाहिजेत.

महत्वाच्या घडामोडी व रोचक तथ्य मिळवण्यासाठी ReadMarathi.Com चे Whats App ग्रुप जॉईन करा