कोरोना महामारीमुळे CID मालिकेतील अभिजीत सापडला आर्थिक संकटात..!

मुंबई : CID मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजीत सर्वांच्याच ओळखीचा आहे. महाराष्ट्रामध्ये या मालिकेची खुप चर्चा पाहायला मिळते. या मालिकेतील “दया कुछ तो गडबड है” हा डायलॉग सर्वांच्याच तोंडीपाठ आहे. आणि अलिकडेच हा डायलॉग सोशल मीडिया वर राजकिय टिका-टिपण्णी करण्यासाठी सुध्दा वापरला जात आहे. अभिजीत किंवा दया म्हटल्यानंतर ही मालिका सर्वांनाच आठवते त्यामुळे या मालिकेची अशी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही.

आदित्य श्रीवास्तव उर्फ अभिजीत सध्या लॉकडाउन मुळे बेरोजगार असल्याचं सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या पोस्ट मुळं दिसतय. CID मालिका तीन वर्षांपूर्वी बंद झाली आहे. या मालिकेच्या बंद पडल्याने अनेक प्रेक्षक नाराज झाले आहे. अलीकडेच त्याने मी देखील आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची माहिती एका मुलाखतीत दिली. तो म्हणाला की, इतरांप्रमाने मी देखील या महामारीचा सामना केला आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन एक-मेकांना मदत करणे गरजेचे झाले आहे. सगळं काही सुरळीत होई पर्यंत तक्रार न करता पुढे जाण्याची गरज असल्याचं मत आदित्यने आपल्या मुलाखतीत मांडले.

आदित्य श्रीवास्तव उर्फ अभिजीतचा एक नवीन सिनेमा येत आहे. त्या सिनेमाचे नाव “वन रक्षक” आहे. या मध्ये अभिजीत एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंग हिमाचल प्रदेश मध्ये झाली आहे. या व्यतिरिक्त अजून काही सिनेमांमध्ये अभिजीतचे काम चालू आहे. त्यामुळे CID मधील एक जबरदस्त रोल मध्ये दिसणारा अभिजीत आता वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment