कोरोना होणार हद्दपार, तज्ञांच्या मते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात…

मुंबई : देशात कोरोनाच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक भयभीत झालेला आहे. दुसरी लाट येवढी भयंकर असणार याची कल्पना केंद्र सरकार आणि राज्यांच्या सरकारांनी केलीच नसावी. झपाट्याने वाढलेल्या रूग्णांच्या संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडलेला आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे पडलेल्या अपुऱ्या आरोग्य सुविधा व कमी पडलेल्या औषधांमुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात मनाला धाडस देऊन जाणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील टास्क फोर्स च्या डॉक्टरांचे विधान ऐकुण सगळीकडे आनंदाचे वातावरण नक्कीच निर्माण होईल यात शंका नाही.

महाराष्ट्रात 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू होणार आहे. लस सरकारी रुग्णालयात मोफत मिळणार व खाजगी रुग्नालायात लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. नागरिकांची लस घेण्यासाठी त्यांच्या जिवाची धावपळ होऊ नये म्हणून 12 तास लसीकरण केंद्रे चालू राहतील. जेष्ठ नागरिकांसाठी सहा तास राखून ठेवण्यात आले आहे तर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठीही सहा तास राखून ठेवावे असंही सांगितले असल्याची माहिती टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिली.

डॉक्टरांच्या मते, ‘मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहे. अलीकडेच एकाच दिवसात मोठ्या संख्येने लसीकरण करुन महाराष्ट्राची देशात नोंद झाली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment