आता कांद्याचे अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला हा निर्णय..!

शेअर करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे कांद्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे कारण जे साठेबाजी करतील अशांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कांद्याचे दर स्थिर राहावे यासाठी सरकारने कांदा(Onion) उत्पादन हंगामात मजबूत बफर स्टॉक(Buffer stock) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे…

येथे पहा – आजचे कांदा बाजार भाव

मिळालेल्या माहितीनुसार यासाठी नाफेडला अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट सरकारद्वारे देण्यात आले आहे.. आजपर्यंत 2 लाख टन इतके बफर झाले आहे. खरेदी एजन्सी मध्य प्रदेश(MP), गुजरात(Gujrat) आणि महाराष्ट्र(MH) या उत्पादक राज्यांमध्ये पुढे जाऊन कांद्याचा साठाही खरेदी करत आहे. सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही संरक्षित साठ्यासाठी कांदा खरेदी सुरू केली आहे.

नाफेड द्वारे आजपर्यंत 52 हजार 460 टन कांद्याची खरेदी झालेली आहे. गेल्या बर्‍याच वर्षांपासून केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक करत आहे. जेव्हा कांद्याचा तुटवडा जाणवेल तेव्हा देखील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी हा साठा करण्यात येत आहे. येणार्‍या हंगामात म्हणजेच 2022-23 मध्ये कांदा उत्पादनात 16.8 टक्के वाढ होण्याची शक्‍यताआहे. अंदाजे 311 लाख टन इतका कांदा उत्पादन होऊ शकतो. मागील हंगामात कांद्याचे उत्पादन जवळपास 266 लाख टन इतके झाले होते.

येथे पहा – आजचे कांदा बाजार भाव

सर्वसाधारणपणे कांद्याचा तुटवडा हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान जाणवत असतो. तेव्हा कांद्याचे दर प्रचंड वाढलेले असतात. यावर नियंत्रण म्हणून बफर स्टॉकच्या माध्यमातून शेतमाल बाजारात या भाज्यांची भाववाढ नियंत्रित करण्याचे धोरण प्रभावी ठरले आहे. दरम्यान येत्या दोन आठवड्यात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा अंदाज आहे. शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…