खुशखबर! म्हाडाच्या या घरांसाठी लवकरच जाहिरात; स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी, पहा सविस्तर..!

Mhada Flats Mumbai : म्हाडाचे परवडणारे घर घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता म्हाडाकडून विरार-बोळींज गृहप्रकल्पामधील घरांच्या विक्रीसाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. या नवीन धोरणाची अंमलबजावणी करून विरार-बोळींजमध्ये असलेली म्हाडाची घरे (Mhada Flats) विकण्याचा महत्वाचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. या धोरणात पाच पर्याय देण्यात आलेले आहे आणि या धोरणांनुसार या घरांची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी आता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Mhada Flats Mumbai

विरार-बोळींज येथे कोकण मंडळाकडून 10 हजार घरांचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पण या प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्याची तसेच अन्य काही समस्या दिसून येत होत्या. त्यामुळे ही घरे विकण्यासाठी म्हाडाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण आता विरार-बोळींजला सुर्या प्रकल्पाचे पाणी मिळत असल्याने ही घरे विकली जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यात अजून एक भर म्हणून अलीकडेच म्हाडाने राज्यातील विक्री न झालेले 11 हजार 184 घरे विक्री करण्यासाठी नवीन धोरण जाहिर केले आहे. त्यामुळे आता विरार-बोळींज येथील घरे (Mhada Flats) विकली जाण्याची आशा निर्माण झाली आहे. या नवीन धोरणामूळे विरार-बोळींजमधील घरे विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो! म्हाडा काढणार 5 हजार 311 घरांची लॉटरी, पहा सविस्तर..!

घरांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात

म्हाडाच्या या घर विक्रीच्या नवीन धोरणात असलेल्या पाचही पर्यायांचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आता लवकरात लवकर रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीकरिता जाहिरात काढून पाचही पर्यायांच्या माध्यमातून घरांची विक्री करण्यात येणार असल्याचे देखील या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले आहे.

येथे वाचा – अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

Leave a Comment