खुशखबर! मुंबईतील म्हाडाच्या दुकानांची जाहिरात प्रसिद्ध; पहा कुठे किती दुकाने? अर्ज कधी सुरू होणार? पहा एका क्लिक वर..!

Mhada Shops Mumbai : मुंबईत परवडणाऱ्या दरात दुकान घ्यायचे आहे का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अनेक वर्षांनंतर मुंबईमधील म्हाडाच्या दुकानांची (Mhada Shops Mumbai) विक्री केली जात आहे. मुंबईतील या दुकानांची संख्या 173 एवढी असून आज (27 फेब्रुवारी) दुकानांच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हाडाच्या दुकानांसाठी अर्ज कधी पासून करता येणार? आणि मुंबईत कुठे किती दुकाने असणार? याची माहिती आपण याठिकाणी जाणून घेऊया.

दुकानांचा लिलाव कसा होतो?

म्हाडा आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये रहिवाशांच्या गरजा ओळखून काही दुकाने बांधते. त्यानंतर म्हाडाकडून या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीचा वापर करून केली जाते. अशा लिलावात म्हाडा दुकानांसाठी निश्चित बोली लावते आणि जो ग्राहक जास्त बोली लावेल त्याला दुकान देण्यात येते. अशा पद्धतीने आजपर्यंत मुंबईमधील अनेक दुकानांचा ई लिलाव पार पडला आहे. या ई लिलावालामध्ये परवडणाऱ्या किमतीत दुकान मिळणार असल्याने त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या 173 दुकानांच्या ई लिलावासाठी 25 लाख रुपयांपासून ते 13 कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

दुकानांसाठी अर्ज कधी पासून करता येणार?

मुंबईमधील म्हाडाच्या 173 एवढ्या दुकानांच्या ई लिलावासाठी अर्जविक्री-स्वीकृती 1 मार्च सकाळी 11 वाजेपासून सुरु होणार आहे. आणि ही अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया 14 मार्च पर्यंत चालणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर या दुकानांच्या ई लिलावाचा निकाल 20 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचं एका अधिकार्‍याकडून सांगण्यात आलं आहे. ज्या पद्धतीने म्हाडाची सोडत संगणकीय पद्धतीने करण्यात येते त्याच पद्धतीने आता ई लिलावाची संपूर्ण प्रक्रिया देखील संगणकीय पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक लोकांना म्हाडात येण्याची गरज पडणार नाही.

कसे आहे सिडकोचे 20 लाखाचे घर? येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..

पहा कुठे किती दुकाने?

(1) जुने मागाठाणे, बोरीवली – 12 दुकाने

(2) प्रतिक्षानगर, शीव – 15 दुकाने

(3) महावीर नगर, कांदिवली – 12 दुकाने

(4) सिद्धार्थनगर, गोरेगाव- 01 दुकाने

(5) न्यू हिंद मिल, माझगांव – 02 दुकाने

(6) शास्रीनगर, गोरेगाव- 01 दुकाने

(7) मजावाडी, जोगेश्वरी – 01 दुकाने

(8) मालवणी, मालाड- 57 दुकाने

(9) स्वेदशी मिल, कुर्ला-रु. 05 दुकाने

(10) बिंबिसार नगर, गोरेगाव- 17 दुकाने

(11) गव्हाणपाडा, मुलुंड- 08 दुकाने

(12) तुंगा पवई- 03 दुकाने

(13) चारकोप, भूखंड क्रमांक 1 – 15 दुकाने

(14) चारकोप, भूखंड क्रमांक 2 – 15 दुकाने

(15) चारकोप, भूखंड क्रमांक 3 – 04 दुकाने

खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment