खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात तब्बल 16 हजार परवडणारी घरे, आता स्वस्तात मिळणार घर, कसा घ्याल लाभ?

Affordable Flats in Thane : मुंबई, ठाण्यासह सध्याच्या काळात नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) सुद्धा घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी तडजोड करावी लागत आहे. पण, आता मात्र सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी घरं मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकरिता पुढाकार घेतला असून सर्व सामान्यांना दिवाळीच्या अगोदरच एक मोठी आणि खास भेट दिली आहे. 

Affordable Flats in Thane

मुख्यमंत्र्यांच्या पाचपाखाडी कोपरी मतदारसंघामधील किसन नगर, टेकडी बंगला आणि हाजुरी परिसरामधील 42.96 हेक्टर एवढ्या परिसराचा क्लस्टर या पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. महाप्रितकडून समूह गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आला असून या योजनेच्या माध्यमातून 16 हजार 578 एवढी खिशाला परवडणारी घरे (Affordable Flats in Thane) उभारण्यात येणार आहेत. 

काय सांगता! ही एक आयडिया घर खरेदी करताना वाचवेल लाखो रुपये, येथे क्लिक करून पहा बातमी..

हा निर्णय गुरुवार रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रहिवाशांना आपल्या हक्काच्या घराचा ताबा न सोडता देखील नव्याने उपलब्ध झालेल्या भूखंडावर उभ्या झालेल्या इमारतींमध्ये घर घेता येणार आहे. या योजनेच्या पाहिल्या टप्प्याची सुरुवात झाली असून सिडकोच्या माध्यमातून ही सुरुवात करण्यात आली आहे.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली घर खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या योजनेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांनुसार घरे पूर्णपणे तयार होण्यासाठी कमीत कमी 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. या प्रकल्पाकरिता सल्लागारांची नियुक्ती करून रितसर आराखडा तसेच नकाशे मंजूर करण्याची प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे. महाप्रितच्या या क्लस्टर प्रकल्पांत किसन नगर, टेकडी बंगला आणि हाजुरी याठिकाणी 5, 6 क्लस्टरसाठीच्या निधी उभारणी प्रक्रियेला मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार याठिकाणी 6 हजार 49 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे. 

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

Leave a Comment