मुंबईकरांनो! थोडं थांबा; येत्या काळात येथे मिळतील खिशाला परवडतील असे एका पेक्षा एक घरे..!

मुंबई : अलीकडच्या काळात आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराचा (Mumbai City) लक्षणीय विस्तार झाला आहे. शहराला उपनगरांशी जोडणारे विविध महामार्ग आणि नवीन सागरी पुलांमुळे, चांगली जीवनशैली आणि आरामदायी घर शोधणाऱ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले असल्याचं दिसून येत आहेत. अशा या मुंबई शहरामधे सध्याच्या घडीला सुद्धा हजारो निवासी प्रकल्पांची (Housing Project) बांधकामे सुरू आहेत.

वर्षभरात म्हणजेच 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत विकासकांनी मुंबई महानगर प्रदेशात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह 1,875 नवीन निवासी प्रकल्प सुरू केले आहेत. महारेराद्वारे गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 4,332 गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये काही एमएमआर प्रकल्पांचा देखील समावेश होतो. त्यामुळे तुम्हाला हव्या त्या भागात आणि परवडणाऱ्या किमतीत घर (Affordable Flats) घ्यायचे असल्यास, तुमच्याकडे नजीकच्या भविष्यात एक उत्तम पर्याय उपलब्ध असणार आहे.

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

नवी मुंबई (Navi Mumbai) पुन्हा नव्या रुपात…
Planned city म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सिडकोने बांधलेल्या या नवी मुंबईतही आतापर्यंत अनेक निवासी प्रकल्प आले आहेत, ज्यात वेगवेगळ्या किमतीत नवीन घरे उपलब्ध करून दिली गेली आहेत. त्यामुळे काही प्रकल्पांचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अनेक लोकांचे पाय मुंबईहून नवी मुंबईकडे वळताना दिसले तर त्यात नवल वाटण्याचं कारण नाहीच.

मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!

अनेकांचा कल नवी मुंबईकडे असण्यामागे काय कारण?

अनेक लोक नवी मुंबईत हक्काचे घर (Affordable Flats Mumbai) खरेदी करण्यात किंवा गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवत आहेत आणि यामागील मुख्य कारण म्हणजे येथील पायाभूत सुविधांचा विकास. घरांची करण्यात आलेली आरामदायी रचना, निवासी भागांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा, मोकळे रस्ते आणि इतर सुविधांमुळे नवी मुंबई अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

खुशखबर! आता म्हाडाच्या घरांमध्ये झाली वाढ; येथे क्लिक करून पहा बातमी..

अनेक बड्या कंपन्यांनी वाशी, बेलापूरसारख्या ठिकाणीही कार्यालयासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. वाशीपासून ते सानपाडा, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, खारघर आणि अगदी पनवेलपर्यंत नेमून दिलेल्या भागात मॉल्स, हॉस्पिटल्स आणि तत्सम सुविधा उपलब्ध करून देत असलेली नवी मुंबई नजीकच्या काळात मुंबईशी स्पर्धा करेल हे नाकारता येत नाही.

नवी मुंबई की मुंबई? कोणाला पसंती?

अटल सेतू, नवीन वाशी खाडी पूल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहज पोहोचण्यासाठी रस्त्यांची उपलब्धता, एपीएमसी आणि इतर अनेक कारणांमुळे वाशी हे महत्त्वाचे केंद्र आहे आणि अशा काही कारणांमुळेच गुंतवणूकदार, गृहखरेदीदार, सामान्य नागरिक आणि उद्योजकांचा ओघ नवी मुंबईकडे वेगाने वाढत आहे. तर मग आता तुम्ही कोणाला पसंती द्याल? नवी मुंबई की मुंबई?

Leave a Comment