खुशखबर! आता ठाण्यात मिळणार स्वस्त घरे; ठाण्यात राबविली जाणार ‘ही’ योजना, पहा महत्त्वाचं अपडेट..!

Affordable Flats Thane : मुंबई किंवा ठाण्यात हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण चांगली नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळवल्यानंतर घर खरेदी करण्यासाठी चांगल्या लोकेशनवर असलेल्या घराचा शोध सुरु करतात. काही लोकांचे घराचे स्वप्न सहज पूर्ण होते. पण काहींना मात्र घराचे स्वप्न पूर्ण करता करता संपूर्ण आयुष्य निघून जातं. तर काहींना आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घराचे स्वप्न देखील पाहता येत नाही. त्यामुळे अशा सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांसाठी सरकार पुढे येत असून त्यांच्यासाठी विविध गृह योजना (Housing Scheme) आणल्या जात आहेत. म्हाडा, सिडको आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुंबई तसेच मुंबई जवळच्या भागातील लोकांना परवडणाऱ्या दरात घरे देण्यात येत आहे. (Affordable flats Mumbai)..

मुंबईत म्हाडाचा प्लॉट सामान्य माणूस घेऊ शकतो का? काय असू शकते किंमत? येथे क्लिक करून पहा

अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार आता तुम्हाला ठाण्यात स्वस्त घर (Affordable Flats Thane) घेण्याची संधी मिळणार आहे. ठाण्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ‘परवडणारी घरे’ योजना (Affordable Housing Scheme) राबविली जात असून ही योजना राबविण्याकरिता ठाणे महापालिकेने बेतवडे याठिकाणी सरकारकडून 2 भूखंड घेतले आहे. महत्त्वाचं म्हणजे या भूखंडावर P.P.P या तत्वावर निविदा मागवून विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. याअंतर्गत आता महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

आता सरकारकडून मिळालेल्या या 2 भूखंडांवर महापालिका क्षेत्रामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकामधील लाभार्थ्यांना कमी किमतीत म्हणजेच परवडणारी घरे (Affordable Flats) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पग्रस्त असलेल्यांना 2 लाख रुपये भरून सदनिका देण्यात येतील अशीही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती अशी की या सदनिकांमध्ये 30 चौरस मीटर एवढे चटई क्षेत्रफळ असणार आहेत. या प्रकल्पामध्ये विकासकांना नियमाने उर्वरित असलेल्या चटईक्षेत्रामध्ये सदनिका तसेच गाळे बांधून त्याची व्यावसायिक विक्री करण्याची मुभा देण्याचा निर्णय देखील महापालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांना कमी दारामध्ये घर तसेच गाळे खरीदी करण्याची संधी मिळणार आहेत.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

Leave a Comment