कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नाही, पण…पहा काय म्हणाले ‘एम्स’ रुग्णालयाचे डॉक्टर

मागील दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने जगाला एक वेगळाच अनुभव दिला. मोठ मोठ्या उद्योगांपासून ते शेतकरी वर्गांपर्यंत अशा सर्वच क्षेत्राला याचा जबर फटका बसला. अनेक कंपन्या आणि कारखाने बंद पडले होते. त्यामूळे असंख्य लोक आर्थिक संकटात सापडले होते. शेती मालाचेही या काळात खुप नुकसान झाले. Aiims Hospital latest news in Marathi

हे रोचक तथ्य वाचा

उद्योग व व्यवसाया पेक्षा लोकांना आपल्या आरोग्याची चिंता सतावत होती. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी केलेला दावा खरच खुप दिलासादायक आहे. कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नाही. पण जो पर्यंत देशातील सर्व नागरिकांचे व्हॅक्सिनेशन पुर्ण होत नाही तोपर्यंत सर्वांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. असं दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉक्टर रनदीप गुलेरिया म्हणाले.

ते पुढे म्हणाले की देशातील सगळ्या नागरिकांचे व्हॅक्सिनेशन (लसीकरण) करणे खुप महत्वाचे आहे. काहींना बूस्टर डोस घेण्याची गरज पडू शकते. पण या विषयी निर्णय घेतला जाईल. पुर्ण लसीकरण झाल्यानंतर बूस्टर डोस विचारात घेतला जाईल. अलीकडचे येणारे आकडे 25 ते 40 हजार जवळपास येत आहे. जर लोकांनी सतर्कता बाळगली तर हा आकडा कमी होत जाईल. कोरोना मुळासकट नाहिसा होणार नाही. तसेच देशात लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामूळे कोरोना रुग्णांची संख्या लवकरच आटोक्यात येणार आहे.

Aiims Hospital latest news in Marathi

रोचक तथ्य आणि ताज्या घडामोडींसाठी Read Marathi चे फेसबुक पेज लाईक करा

Leave a Comment