अजित पवारांची मोठी घोषणा; 1 जुलै रोजी ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार रुपये..!

शेअर करा

सध्या शेतकऱ्यांची बियाणे, खते खरेदीची वर्दळ सुरू आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार येणार या निर्णयाने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हे पैसे कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार? याची सविस्तर माहिती आपण या बातमी मध्ये जाणून घेणार आहोत..(Ajit Pawar’s big announcement; On July 1, these farmers will get Rs 50 thousand rupees)

सत्तेत आल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने सतत शेतीत तोट्यात असणाऱ्या बळीराजाचे कर्जाचे ओझे पूर्णतः कमी करण्याचा निर्णय घेऊन, शेतकरी राजाला कृषी कर्जातून मोकळे केले. कर्जमाफीचा निर्णय शेतकाऱ्यांसाठी खूप मोलाचा ठरला. शेतकऱ्यानं मार्फत सतत मागणी केला गेलेला कर्जमाफीचा मुद्दा, सरकारने महात्मा फुलें कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून मार्गी काढला.

येथे वाचा  – महाराष्ट्रात मॉन्सून ‘या’ दिवशी; शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा ‘हा’ सल्ला महत्वाचा, वाचा सविस्तर..!

हा निर्णय घेतल्या बरोबर महाविकास आघाडी सरकारने, नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर  आर्थिक सहाय्य करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये वर्ग केले जाणार होते. पण, कोरोना व्हायरस या संकटामुळे आपत्ती जन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडला. या कारणामुळे राज्य सरकार आपले आश्वासन पूर्ण करू शकले नाही.

आता 3 वर्षाचा काळ उलटून गेला असला तरी पण शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार मिळालेले नाही. तितक्यातच नुकताच राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे.

येथे वाचा – कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांनी येत्या 1 जुलै पासून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन पर राशी 50 हजार रुपये मिळतील अशी घोषणा केली. यामुळे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला शासन निर्णय मार्गी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या राशी चा नक्कीच खूप फायदा होणार आहे.

1 जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेतला असावा असे वाटते. तसेच कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांची देखील नेमणूक लवकरच केली जाणार आहे. त्या बरोबरच शेतकरी आंदोलनातील शेतकाऱ्यांवरील गंभीर गुन्हे जसे की सार्वजनिक मालमतेचे नुकसान व जीवित हानी वगळता इतर गुन्हे मागे घेतले जातील असे विधान अजित दादांनी मंगळवारी केले.

बाजार भाव आणि शेती विषयक महत्त्वाच्या घडामोडीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Leave a Reply

Your email address will not be published.