आज पर्यंत आपन अनेक जंगले बघीतली असतील. जंगलांमध्ये फिरण्याचा आंनद घेतला असेल. पण जगात एक असे जंगल आहे की जे सर्वात खतरनाक आणि रहस्यमय जंगल म्हणून ओळखल्या जाते. ते म्हणजे अमेझॉननचे जंगल. (Amazon Jungle information in Marathi)
हे जंगल जगातील सर्वात खतरनाक आणि रहस्यमयी आहे. या रहस्यमयी जंगलात अनेक विषारी किडे, जीवजंतू आणि खतरनाक प्राणी आहेत. येथील छोटे-छोटे किडे आणि प्राणी माणसाचा जीव घेऊ शकतात. (The most dangerous jungle in Marathi)
या जंगलात फिरायला जाणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे आहे. जर कोणी या जंगलात चुकून गेला तर त्याचे बाहेर येणे अशक्य असते. कारण हे जंगल खुप घनदाट आहे. येथे असलेल्या घनदाट वृक्षांमूळे सुर्याचे किरण देखील जमीनीपर्यंत पोहोचत नाही.
अमेझॉनचे जंगल बाहेरून जेवढे आकर्षक दिसते तेव्हढेच ते आतून भयंकर आणि रहस्यमय आहेत. (Mysterious Jungle in Marathi).
तुम्ही या भयंकर जंगलात फोन सुद्धा लावू शकत नाही. कारण इथे मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही
जगातील सर्वात मोठे जंगल. (The largest Amazon Jungle in Marathi)
अमेझॉन जंगल जागातील सर्वात मोठे जंगल आहे. या जंगलाचा विस्तार 9 देशांमध्ये आहे. जंगलाचा सर्वात मोठा भाग (60 टक्के) ब्राझील देशात आहे. त्यानंतर या जंगलाचा 13 टक्के भाग (दुसरा मोठा भाग) पेरू देशात आहेत. कोलंबिया, फ्रान्स, इक्वेडोर, गयाना, बोलिव्हिया, सुरीनाम आणि व्हेनेझुएला या देशात अमेझॉनचे जंगल पसरलेले आहेत. पृथ्वीच्या एकून 4 टक्के भागात हे जंगल पसरलेले आहे.
अमेझॉन जंगलाचे क्षेत्रफळ 55 लाख चौरस किलोमीटर इतके आहे. (The largest Jungle in Marathi)
अमेझॉन जंगलातील रोचक तथ्य. (Amazon Jungle Interesting facts in Marathi)
अमेझॉन जंगलाबद्दल मानवाला पुर्णपणे माहिती नाही. या जंगलामध्ये असे अनेक रहस्यमय ठिकाणे आणि प्राणी आहेत. ज्यांचा शोध अजून पर्यंत शास्त्रज्ञ लावू शकले नाहीत.
मानवाला विचार करायला भाग पाडणारे वृक्ष, प्राणी आणि ठिकाणे अमेझॉनच्या जंगलामध्ये आहेत. अमेझॉनच्या जंगलामध्ये आढळणारे चालणारे झाड, रहस्यमय नदी, खतरनाक पोटू पक्षी, विषारी बेंडूक आणि मुंगी (Bullet Ant) यांच्या बद्दल माहिती वाचल्यानंतर निसर्ग किती रहस्यमय आहे हे तुम्हाला समजेल.
पृथ्वीला 20% ऑक्सिजन एकटं अमेझॉन जंगल पुरवते. म्हणून अमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस म्हटले जाते.(Lungs of the earth)
या जंगलात 500 पेक्षा जास्त आदिवासी प्रजाती आहेत. पण यामध्ये 40 ते 50 टक्के प्रजातींचा बाहेरच्या जगाशी संपर्क नाही. जे लोक या प्रजातींचा शोध घेण्यासाठी गेले ते परत जिवंत परतले नाही. यावरून आपन या प्रजाती किती खतरनाक असतील याचा अंदाज लावू शकतो.
अमेझॉनच्या जंगलामध्ये 17 हजारांपेक्षा जास्त झाडांच्या प्रजाती आहेत.
चालणारे झाड (Walking tree in Marathi)
अमेझॉनच्या जंगलात 17 हजार झाडाच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी एक ‘सॉक्रेटिया एक्सोरिझा'(Socratea exorrhiza) नावाचे झाड चालणारे झाड म्हणून ओळखले जाते.
या झाडाला वॉकिंग पाम (Walking Palm) देखील म्हटलं जातं. सावलीतून सुर्यप्रकाशाकडे हे झाड खुप मंदगतीने सरकते. हे झाड आपल्या मुळ्यांच्या सहाय्याने जागा बदलत असते. एक ते दोन वर्षानंतर हा फरक दिसून येतो.
अमेझॉन नदी. (Amazon river in Marathi)
अमेझॉनच्या जंगलातील अमेझॉन नदी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. जगातील 20 टक्के नद्या अमेझॉनच्या नदीला येऊन मिळतात. या नदी मध्ये 5 हजारांपेक्षा जास्त माशांच्या प्रजाती आढळतात.
अमेझॉन जंगलात आढळणारे खतरनाक प्राणी व जीवजंतू. (Dangerous animals in Amazon rainforest in Marathi)
(1) बुलेत अँट. (Bullet Ant in Marathi)
अमेझॉनच्या जंगलात बुलेत अँट नावाची मुंगी खुप मोठ्या प्रमाणात आढळते. ही मुंगी खुपच विषारी आहे. मुंगी चावल्यानंतर होणारा त्रास माणूस सहन करू शकत नाही.
तिच्या विषामूळे मानसाला खुप ताप येतो. बुलेत अँट मुंगीने डंक मारणे बंदूकीच्या गोळी सारखा समजला जातो म्हणूनच तिला बुलेट अँट (Bullet Ant) म्हणतात.
(2) विषारी बेडूक. (Amazon Frog in Marathi)
अमेझॉनच्या जंगलात 120 प्रजातींचे बेडूक आहेत. या विषारी बेडकांचा कलर खुपच आकर्षक आणि रंगीबेरंगी असतो. पण ते दिसायला जेवढे आकर्षक असतात तेव्हढेच विषारी असतात.
एका बेडकाच्या विषामूळे दहा माणसे मरू शकतात एवढे विष एका बेडकामध्ये असते.
(3) जायंट स्पायडर. (Gaint Spider in Marathi)
आपन सर्वांनी मोठ-मोठे जायंट स्पायडर हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये बघितले आहे. सिनेमा मधील ते स्पायडर बघून आपन खुप घाबरून जातो. अशाच प्रकारचे मोठ मोठे स्पायडर अमेझॉन जंगलात असल्याचा दावा जंगला जवळ राहणाऱ्या लोकांनी केला आहे.
कुत्रे आणि मांजराच्या आकाराचे स्पायडर बघितले असल्याचं तेथील लोक सांगतात. पण याचे अजून पर्यंत खात्रीशीर पुरावे मिळालेले नाही.
(4) खतरनाक पोटू पक्षी. (Potoo Bird in Marathi)
अमेझॉन मध्ये असलेल्या खतरनाक पक्षांपैकी हा पोटू (Potoo) नावाचा पक्षी खुपच खतरनाक आहे. झाडावर बसलेल्या या पक्षाला शोधणे अशक्य असते. कारण झाडाच्या फांद्यांप्रमाणे हा पक्षी आपल्या शरीराचा आकार बनवत असतो. त्यामूळे तो मोठ्या प्रमाणात प्राण्यांची व पक्षांची शिकार करत असतो.
पोटू नावाचा हा पक्षी दिवसा दिसत नाही. तो झाडाच्या फांदीवर एकाच स्थितीत बसून राहतो. त्यामूळे झाडाची फांदी आणि पोटू पक्षी यामधील फरक ओळखता येत नाही. शिकार करण्यासाठी तो फक्त रात्रीच्या वेळेला बाहेर पडतो.
(5) एनाकोंडा. (Anaconda)
अमेझॉनच्या जंगलामध्ये सापाच्या 70 प्रजाती आहे. त्यापैकी एनाकोंडा आणि जायंट साप मोठ्या प्रमाणात आढळतात. एनाकोंडा दिसायला खुपच खतरनाक आहे. पृथ्वीवर असलेल्या सापांपैकी एनाकोंडा सर्वात लांब साप आहे. हा साप आपल्यापेक्षा लहान प्राण्यांना गिळून घेतो. या जंगलात खुपच भयंकर मोठ मोठे साप अस्तित्वात आहे.
मानवाला अजून पर्यंत माहिती नसलेल्या मोठ-मोठ्या विषारी सापांच्या प्रजाती या जंगलात असू शकतात. (Dangerous animal in the world)
अमेझॉन जंगलातील रहस्यमय नदी. (Mysterious river in Amazon jungle in Marathi )
या जंगलात एक अशी नदी आहे जिचं तापमान 110 डिग्री पेक्षा जास्त असते. या नदी मधील पाणी उकळताना दिसून येते. हे पाणी खुपच गरम असते. या नदीतून गरम पाण्याची वाफ नेहमी निघत राहते. हे एक अमेझॉन जंगलामधील या नदीचे मोठे रहस्य आहे.
या जंगलात आढळणाऱ्या आदिवासी समूहातील जर कोणी मृत्युमुखी पडले तर त्याला या नदीच्या गरम पाण्यात टाकले जाते. काही आदिवासी समूह या नदीला स्वर्गाचा दरवाजा देखील म्हणतात.
अमेझॉन जंगलातील आग. (Amazon forest fire in Marathi)
अमेझॉन जंगल संपुर्ण जगाला ऑक्सिजन पुरवते. या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुसं म्म्हटलं जातं. ब्राझीलमध्ये असलेले हे जंगल फक्त ब्राझीलसाठीच महत्वाचे नसून ऑक्सिजनसाठी संपुर्ण जगाला त्याची गरज आहे. पण काही वर्षांपूर्वी संपुर्ण जगाला हादरा देणारी घटना अमेझॉन जंगलात घडली. अमेझॉनचे जंगल जळत असल्याचं संपुर्ण जगाने पाहिले. ही जगासाठी धोख्याची घंटा आहे असच म्हणावं लागेल.
जंगलात वणव्यामूळे आग लागणे ही सामान्य बाब आहे. तशी छोट्या मोठ्या प्रमाणात अमेझॉनच्या जंगलात वणव्यामूळे नेहमी आग लागत राहते. पण मागील एक ते दोन वर्षांपासून या जंगलात आग लागण्याचे प्रामाण 84 टक्क्यांनी वाढले आहे. याला मानव आणि प्राकृतिक घटना जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.
ब्राझील मधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च’ (INPE) च्या मते अमेझॉनच्या जंगलाला एक वर्षात 74,155 वेळा आगीचा सामना करावा लागला आहे. आणि न्यूज मोंगाबे डॉट कॉम नुसार 2020 मध्ये 54 लाख एकर अमेझॉनचे जंगल या आगीमुळे जळाले आहे. या मध्ये असंख्य जंगली प्राण्यांचा जीव गेला आहे. ही मनाला खुपच वेदना देणारी घटना आहे.