राज्यात येणार दुसरं संकट; येत्या चोवीस तासात…

मुंबई : राज्याला कोरोनाचे महासंकट भेडसावत असतांना राज्यात दुसरे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या चोवीस तासात महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट सह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात येत्या पाच ते सहा दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, मुंबई व पुणे या भागामध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. अजुन काही दिवस मुंबई मध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेची बदललेली दिशा आणि कमी दाबाचा तयार झालेला पट्टा या कारणाने जोरदार पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिका-फळांना या पासून नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुणे शहरात मागिल तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातारण निर्माण झाले होते. रिमझिम पावसाने काही भागात उपस्थिती दर्शवली होती. पुढिल काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपुर मध्ये जोरदार पाऊस आणि प्रचंड हवेमुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले होते.

रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी समोरील जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपुर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापुर, सांगली, सातारा, जालना, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नगर, कोल्हापुर, पुणे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात बुधवार पर्यंत पावसाची शक्यता आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment