आनंदाची बातमी! आता या लोकांसाठी ठाणे, कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरात देखील म्हाडाची घरे..!

Mhada Flats Mumbai : मुंबई, ठाणे, कल्याण आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात घरांना खूप महत्व प्राप्त झाले आहे. या भागात गेल्या काही वर्षात घरांच्या किंमती खूपच वेगाने वाढल्या आहे. मुंबईत मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे आणि सुविधांमूळे घरांच्या आणि जागेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. पण याठिकाणी घरांच्या किंमती कशाही असल्या तरी प्रचंड प्रमाणात रोजगार आणि गरजेच्या सुविधा मिळत असल्याने घरे घेणार्‍यांमध्ये स्पर्धा दिसून येते. त्यामुळे येथील घरांच्या किंमती महाग आहेत. पण आता मुंबई महानगर प्रदेशात कमी किमतीत मिळणारी म्हाडाची घरे (1 bhk flat Mumbai) मिळत असून त्यासाठी अर्ज करता येतो.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

Mhada Flats Mumbai

आता पुन्हा म्हाडाच्या घरांसंदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे. आता गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरात देखील घरे मिळणार आहेत. ठाणे, कल्याण येथे असलेल्या 54 एकर भूखंड गिरणी कामगारांच्या घरांकरिता (Mill worker houses) महसूल विभागाकडून उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पार पडलेल्या सकारात्मक बैठकीनंतर म्हाडाने मुंबई महानगर परिसरामधील महसूल विभागाच्या भूखंडांची चाचपणी करायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळाली आहे. पात्र असलेल्या सगळ्या गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यामधील काही भूखंडांची तपासणी म्हाडाकडून सुरू करण्यात आली आहे.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

गिरणी कामगारांच्या घरांबाबत लवकरात लवकर भूखंड मिळावेत, असा म्हाडाचा प्रयत्न असल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. ठाणे याठिकाणी असलेल्या उत्तरशीव आणि कल्याण मधील हेदुटणे, रायते आणि गौरीपाडा याठिकाणी असलेला 54 एकर भूखंड प्रति चौरस मीटर 1 रुपया या दराने गिरणी कामगारांच्या घरांकरिता म्हाडाला उपलब्ध करुन देण्यासाठीचा महत्वाचा असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या भूखंडावर गिरणी कामगारांकरिता तब्बल 19 हजार एवढी घरे (Mhada Flats Mumbai) उभी करण्याचा म्हाडाचा मानस आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

महत्त्वाचं म्हणजे याशिवाय कुर्ला याठिकाणी असलेल्या स्वदेशी मिलमधील 122 एवढी घरे गिरणी कामगारांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेंच्युरी मिलमधील भूखंड आणि काळा चौकी याठिकाणी 22 हजार चौरस मीटरवर गिरणी कामगारांकरिता 3 ते 4 हजार एवढी घरे बांधता येईल का, याची देखील म्हाडाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. इंडिया बुल्स कंपनीकडून एमएमआरडीएला (MMRDA) देण्यात आलेली घरे आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतची 1 लाख 31 हजार 437 एवढी घरे गिरणी कामगारांकरिता उपलब्ध करुन देता येईल का, याचा देखील विचार सुरु असल्याचे सांगण्यात आलं आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment