भारताला मदतीचा ओघ सुरूच, Google, Microsoft नंतर Apple करणार आर्थिक मदत..!

दिल्ली : कोविडमुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देशात सर्वत्र आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा झालेला आहे. आरोग्य साधनांच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. भारतामध्ये निर्माण झालेल्या या बिकट परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात होती. जगातील बऱ्याच देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि काही देशांनी मदत सुरू केली आहे. देशांतर्गत सुद्धा कोविडशी दोन हात करण्यासाठी मदत देण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील मोठ मोठे उद्योग या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी समोर आले आहे. टाटा, रिलायन्स आणि महिंद्रा & महिंद्रा या कंपन्यांनी सरकारला व प्रत्यक्ष जनतेला मदत केली आहे.

जगातील मोठ मोठ्या कंपन्यांनी देखील मदत करायाला सुरवात केली आहे. गूगलचे सीईओ यांनी कोविड विरुध्द लढाई जिंकण्यासाठी मदत म्हणून तब्बल 135 कोटी रुपये देण्याची घोषना केली. मायक्रोसॉफ्ट कंपनीची सीईओ सत्या नडेला यांनी देखील भारताला वैद्यकीय कार्यासाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

अमेरिकेतील एक मोठ्या कंपनीने मदत देणार असल्याच जाहीर केलं आहे. ती कंपनी आहे अॅपल.
अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी ट्वीट करत आपले मत मांडले आहे. कोरोनाच्या विरुध्द लढणाऱ्या योद्धांसाठी मदत करणार असल्याचं टीम कूक यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. पण नेमकी किती मदत करणार हे अजून जाहीर केलेलं नाही.
त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय, कोरोना योद्धे, आरोग्य क्षेत्रातील सर्वजन आणि आमच्या कंपनीतील सर्व भारतीय कर्मचारी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लवकरच या परिस्थितीशी सामना करण्यासाठी अॅपल मदत देणार आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment