आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, पहा लोकेशनसह घराची किंमत..!

1 bhk mhada Flats Mumbai : मुंबईमध्ये जर घर असेल तर तो व्यक्ती श्रीमंत आहे असं म्हटलं जातं. त्याचे कारण म्हणजे मुंबईत रिअल इस्टेटच्या (Real Estate Mumbai) किंमती महाग आहे. आणि देशभरातील अब्जाधीश लोक मुंबईत राहतात. त्यात पुन्हा देशातील सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार याच मुंबईत राहतात, त्यामुळे मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. म्हणून मुंबईत घर (1 bhk flat Mumbai) घेण्याचं आणि इथे येऊन राहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबईत असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे हक्काचे घर नाही, त्यांना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. त्यामूळे अशा लोकांना म्हाडाकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिले जातात. तुम्हाला सुद्धा म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा असेल तर आता तुम्ही 20 जानेवारी पर्यंत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकता. चला जाणून घेऊया घरांचे लोकेशन आणि किंमत..

म्हाडा तसेच चट्टा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून अंबरनाथ तालुक्यामधील वांगणी येथे चड्डा रेसिडेन्सी या गृहनिर्माण प्रकल्पामधील 2 हजार वन बीएचके घरांच्या (1 BHK Flat Mumbai) विक्रीकरिता आयोजित संगणकीय प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी तसेच अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा करावा, असे चट्टा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे..

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

एवढी आहे घराची किंमत (Mhada Flats)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेची पूर्ती करण्याच्या उद्देशाने चड्ढा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून  ठाणे जिल्ह्यामधील वांगणी याठिकाणी 155 एकर एवढ्या जागेवर 7 मजले असलेल्या 133 इमारतींचा भव्य प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पातून जवळपास 25 हजार एवढ्या घरांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्यामध्ये 8 हजार 200 एवढ्या घरांचे बांधकाम होत असून यात वन बीएचके (1 bhk flat) असलेल्या 348 चौरस फूट आकाराच्या अद्ययावत तसेच दोन बाल्कनी असलेल्या सुसज्ज सदनिका बांधण्यात आल्या आहे. यातील एका सदनिकेची किंमत 16 लाख 80 हजार रुपये एवढी आहे. महत्त्वाचं म्हणजे यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचा समावेश नाहीये.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

या संगणकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन सादर केल्या जाणार्‍या अर्जासोबत अर्जदाराने प्रत्येकी 5 हजार 590 रुपये एवढी अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर ऑनलाइन पेमेंट स्वीकृतीकरिता 21 जानेवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत तसेच ऑनलाइन बँकेत RTGS/ NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता 22 जानेवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत दिली गेली आहे. आणि या सदनिका विक्रीची सोडत 26 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजेला करण्यात येईल.

अरे वा! नव्या वर्षात म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, येथे क्लिक करून पहा कुठे असणार घरे?

Leave a Comment