मुंबईत घर घेताय? थोडं थांबा आणि बिल्डरला विचारा ही महत्वाची माहिती… नाही होणार फसवणूक..!

मुंबई : मोठमोठ्या शहरांमध्ये घर तसेच फ्लॅट खरेदी करण्याची संस्कृती अलीकडे सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. सर्वत्रच जमिनीचा तुटवडा भासत आहे आणि जमिनीच्या किमती देखील गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक बिल्डरांकडून घर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत (ready to move flats in mumbai). यामुळेच घर खरेदी करणारी व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी तसेच घर बांधण्याच्या त्रासामधून पूर्णपणे मुक्त होते आणि अशावेळी त्यांना विविध आवश्यक सुविधा सुद्धा उपलब्ध होतात. तरीही, हे सर्व काही वाटते तितके सोपे नाही.

घर, फ्लॅट किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर नक्कीच हा महागडा सौदा आहे. त्यामुळे सर्व निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे. विशेष भाग म्हणजे घर किंवा फ्लॅट ची खरेदी करत असताना त्यापूर्वी बिल्डर किंवा डेव्हलपर्स च्या आश्वासनांची व डाव्यांची अगदी काळजीपूर्वक चौकशी करावी (buying home in mumbai). घराची किंवा फ्लॅटची खरेदी करत असताना लोकांना विविध अडचणी येतात आणि अशावेळी त्यांची काळजी नाही घेतली तर नक्कीच खरेदी धारकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.

मालमत्ता प्री-अप्रूव्ह असल्याची खात्री करा!

कोणत्याही मालमत्तेमध्ये पैसा गुंतवत असताना त्यापूर्वी बिल्डरने सादर प्रकल्प नक्की कोणत्या बँकांशी केलेला आहे? याची पडताळणी करून घ्यावी व उत्तर समजताच संबंधित बँकेकडे खात्री करावी. कारण की बँकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पास सुरक्षित मानले जाते. तसेच प्रकल्प विभाजित होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. अशा प्रकल्पांमध्ये गृह कर्ज अगदी सहजपणे उपलब्ध होते.

मुंबईकरांनो! तयारीला लागा; आता पुन्हा एकदा स्वस्तात म्हाडाचे घर घेण्याची संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

प्रसिद्ध तसेच विश्वासू बांधकाम व्यावसायिक त्यांचा प्रकल्प सुरू करत असताना त्यापूर्वी काही बँकांना त्यांचे भागीदार बनवत असतात. यामुळेच त्यांना निधीची कोणतीही अडचण होत नाही. सर्व बँका चांगल्या बांधकाम व्यवसायिकांची यादी ठेवत असतात. ज्या यादीला प्री-अप्रूव्ह यादी म्हणतात.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

ठिकाण तसेच मिळणाऱ्या सुविधांचा सविस्तरपणे विचार करावा;

बिल्डर किंवा डेव्हलपर प्रकल्पांमध्ये ज्या विविध सुविधा देण्याबाबत बोलत आहे त्याची पुष्टी करावी. उदाहरणार्थ त्याचे स्थान नक्की कोणते आहे? व तिथून तुमचे कार्यालय किती अंतरावर असेल? यासोबतच तुमच्या मुलांची शाळा व इतर काही सुविधा जवळपास किती अंतरावर असतील? याची पडताळणी करावी.

याशिवाय आपण बघितले तर फ्लॅट किंवा घर खरेदी करत असताना त्यापूर्वीच बिल्डर किंवा विकासक तुमच्याकडून मालमत्तेच्या विषयी कोणतीही कायदेशीर बाब लपवत आहेत का? याची तपासणी करावी. असे असेल तर भविष्यामध्ये घराची विक्री करत असताना तुम्हाला नक्कीच अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच बांधकामाच्या दर्जाबाबत सुद्धा तुम्हाला पूर्णपणे माहिती असायला हवी.

तुमच्या बिल्डरच्या प्रकल्पामध्ये तुम्ही नवीन घर, जमीन किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करत असाल तर त्या ठिकाणी जाऊन पहाणी करावी. याशिवाय बिल्डरचे मागील प्रकल्प तपासून घ्यावेत. जुन्या प्रकल्पांमध्ये बिल्डरने वेळेवर ताबा दिला आहे की नाही? त्यांनी दिलेली संपूर्ण आश्वासने पूर्ण केले आहेत का? हे जाणून घ्यावे यासाठी तुम्ही संबंधित लोकांशी बोलू शकता व रियल टाईम फीडबॅक मिळवू शकतात.

Leave a Comment