लय भारी निर्णय! आता ‘या’ शेतकर्‍यांना देखील मिळणार अतिवृष्टीची मदत, दिवाळी झाली गोड..!

अलीकडे काही दिवसांपासून राज्यात परतीचा जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील बर्‍याच भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी पोत्यात भरण्या योग्य शेतमाल पाण्यामुळे शेतात खराब होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी पण अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामूळे सरकार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देणार आहे. तरी देखील बरेच शेतकरी या मदती पासून वंचित राहणार होते. कारण बरेच शेतकरी या मदतीच्या निकषात बसत नव्हते.

त्यामूळे हे शेतकरी आता मदती पासून वंचितच राहणार असे वाटत होते. पण माय बाप सरकार या शेतकर्‍यांच्या मदतीला धावले आहे. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते पण मदतीच्या निकषात बसत नव्हेत आता अशा शेतकर्‍यांना मदत करण्यासाठीचा शासन निर्णय(GR) शासनाने काढलेला आहे.

निधी वितरित करण्या संदर्भातील सूचना मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णयाद्वारे(GR) दिल्या होत्या. महत्वाचे म्हणजे काल मदत व पुनर्वसन विभागाने पुणे, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद या विभागाकरिता 755 कोटी(Cr) रुपये वितरणासाठी शासन निर्णय काढलेला आहे. या तीन विभागातील 9 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे त्या शेतकर्‍यांना फायदा झाला आहे ज्यांचे जून-ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते पण ते मदतीच्या निकषात बसत नव्हते..

महत्वाची माहिती अशी की यापूर्वीच जे शेतकरी निकषात बसत नाही अशा शेतकर्‍यांसाठी निर्णय राज्य सरकारद्वारे निर्णय घेण्यात आला होता. पण आता काल काढलेल्या या शासन निर्णयामुळे तोंडावर आलेली दिवाळी गोड होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ही मदत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.