कोरोनाची लस घेतल्यानंतर या गोष्टी करणे टाळा; डब्ल्यूएचओ..!

मुंबई : कोरोना आजार येऊन एक वर्ष उलटून गेले तरी कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या आणि नागरिकांमधील भीती काही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर रुग्णसंख्या खुप झपाट्याने वाढली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे कोरोनाचे हॉटस्पोट जिल्हे म्हणुन समोर येत आहे. ही भयानक परिस्थीती लक्षात घेता कोरोनाचे हॉटस्पोट असलेल्या जिल्ह्यांत लॉकडाउन लावण्यात येत आहे. परिस्थीती जर हाताबाहेर गेली तर महाराष्ट शासन पुन्हा महाराष्ट्रात कडक लॉकडाउन लावण्याचे आदेश देऊ शकते अशी माहिती मिळत आहे.

अश्या परिस्थितीत सामान्य जनतेमध्ये खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकतर पोटापाण्याचा प्रश्न आणि त्यात कोरोनाची भीती आणि त्यावर उपलब्ध असलेल्या लसी बाबत मनात शंका. या गोष्टी लक्षात घेता डब्ल्यूएचओ ने एक अहवाल जारी केला आहे. लसीकरण केल्यानंतर ताप येणे, अंग दुःखी होणे, स्नायूंमध्ये वेदना होणे ही सामान्य बाब असल्याचं डब्ल्यूएचओ चे म्हणणे आहे.

The most selling mobile phone

लसीकरण झाल्यानंतर थोडे दिवस काळजी घेणे गरजेचे आहे असे काही तज्ञांचे मत आहे. काही काळा साठी काही गोष्टी टाळाव्या असं त्यांच मत आहे. काय करणे टाळावे ते पुढीलप्रमाणे.

(1) व्यायाम करु नये – तज्ञांच्या मते लसीकरण केल्यानंतर अंग दुःखी होते. कमजोरी येने, स्नायूंचे दुःखने यामुळे काही दिवस व्यायाम करणे टाळावे.

(2) लसीकरण केल्यानंतर लगेच दुसरी लस टाळणे – लसीकरण केल्यानंतर लगेच अन्य आजाराची लस घेऊ नये. कोरानाची लस घेतल्यानंतर अन्य लस घेन्यासाठी किमान दोन आठवडे अंतर असणे कधीही चांगले असं काही तज्ञांच मत आहे.

(3) शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका – जास्त पाणी पिल्यामुळे शरीरात रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होते म्हणुन शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका.

(4) अंगावर टॅटू काढु नये – काही वैद्यकिय तज्ञांच्या मते अंगावर टॅटू काढल्यामुळे इंफेक्शन होऊ शकते, त्यामुळे काही दिवस अंगावर टॅटू काढु नये.

आणि विशेष कोरोना लसीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफ़िकेटची प्रवासासाठी आणि व्हिसा मिळवण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्टिफ़िकेट व्यवस्थीत जपून ठेवावे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment