शेतकर्‍यांनो ! सतर्क रहा; उद्या ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा..!

Read Marathi Online : नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे मान्सूनच्या प्रवासाकडे लागून आहे. 27 मे ला केरळ मधे दाखल होईल, असं वाटणारा मान्सून (Monsoon) अजूनही केरळ मधे दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे. पण त्यापूर्वीच मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. (Be careful; Heavy rains hit ‘this’ districts tomorrow ..!)

राज्यातील काही भागांबरोबरच मान्सून पूर्व पावसाने मुंबई उपनगरामधे हजेरी लावली असल्यामुळे रहिवाश्यांना जीव घेण्या गर्मी पासून तूर्तास सुटका मिळाली आहे. पडलेल्या पावसामुळे वातावरण सध्या गार झाले आहे.

मागील काही दिवसांपासुन श्रीलंकेत मान्सून पोहचला आहे. हवामानातील बदलामुळे मान्सून चा प्रवास काहीसा मंदावला आहे. 27 मे पर्यंत मान्सून केरळ मधे हजेरी लावणार होता पण सध्या तो श्रीलंकेतुन पुढे निघाल्याने येत्या 72 तासांमध्ये केरळ मधे दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांच्या नजरा सध्या मान्सूनच्या केरळ मधील आगमनाकडे लागून आहे.

मान्सून ने सध्या लक्षद्वीप, मालदीव बेटांवरती तसेच दक्षिण अरबी समुद्र या भागांमध्ये हजेरी लावली आहे. पुढील वाटचाली साठी मान्सून ला वातावरण अनुकूल असल्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसा मध्ये केरळ मध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे. तरी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रातील बऱ्याचश्या भागांना झोडपण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना बसणार जोरदार तडाखा

उद्या (30 मे रोजी) महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभाग आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामाना विभागा मार्फत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासाहित पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे.

त्यासोबतच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड व हिंगोली या जिल्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 30 व 31 तारखेला पाऊस या जिल्यांमध्ये हजेरी लावेल. असा अंदाज हवामान विभागा मार्फत देण्यात आला आहे. मान्सून केरळ मध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे आता मॉन्सूनचे आगमन महाराष्ट्रातही उशिरा होण्याची शक्यता आहे… अशाच हवामान विषयक बातम्या, बाजार भाव आणि कृषी योजनांची माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment