मास्क खरेदी करत असाल तर सावधान…!

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण कोरोनाला रोखण्यासाठी आपन निष्काळजीपणा करत घेत असलेली खबरदारी. फक्त तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर लावून कोरोनाला रोखता येणार नाही तर आपल्याला अधिकच्या खबरदारीची गरज आहे. अपूरी खबरदारी घेऊन लोक बिनधास्तपणे समाजात वावरत असतात. पण एक प्रकारे आपन कोरोनाला पसरवण्याचं काम आपल्या हातातून घडत आहे याची त्यांना अजिबात कल्पना नसते. मग अशा कृतीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची अधिक शक्यता असते. कोरोनाचा अटकाव घालण्यासाठी केल्या जाणार्या अपुऱ्या खबरदारी याला कारणीभूत असू शकतात.

मास्क खरेदी करतांना या गोष्टींचा विचार करा
आज मास्क खरेदी करण्यासाठी आपल्याला बाहेर गावी जाण्याची गरज भासत नाही. मास्क आज छोट्या-मोठ्या दुकानांवर उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांमध्ये मास्क वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती असे सर्वजन मास्कचा वापर करत आहे. पण मास्क खरेदी करण्यापुर्वी एक महत्वाची गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. दुकांनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध असतात. लोक आपल्या पसंतीनूसार घेत असताना त्याची साइज़ व घातल्यानंतर कसा दिसेल हे बघण्यासाठी त्याला आपल्या तोंडावर लावून बघतात. दिवसभरात असं अनेक मास्क खरेदीदार करत असतात. त्यामुळे एका व्यक्ती पासून दुसर्या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी मास्क खरेदी असाल तर सावध व्हा. आणि अधिकची खबरदारी घ्यायची सवय लावून घ्या. आपन केलेला निष्काळजीपणा आपल्या परिवारासाठी घातक ठरू शकतो…Stay home stay safe …

Leave a Comment