सावधान! देशात कोरोनाची तीसरी लाट दीड महीन्यातचं धडकेल?..!

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटे मध्ये तर अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले. अनेक लहान मुले अनाथ झाली. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका देशाला निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांच्या बेजबाबदार वागणूकीमूळे तिसरी लाट दीड ते दोन महीन्यातचं येऊन धडकेल असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

बऱ्याच जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. नागरिक गाफील होउन सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहे. परिस्थिती तर प्रशासनाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जर लोक आत्ताच सावध झाली तर तिसरी लाट टाळता येऊ शकते किंवा तिची तीव्रता कमी होऊ शकते असं मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

सध्या ब्रिटन तिसऱ्या लाटेचा सामना करतोय. मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे हे ब्रिटन पुढे सर्वात मोठे आव्हान आहे. ब्रिटन हा मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे आणि व्हायरसच्या आव्हानांचा सामना एकाचवेळी करीत आहे असं लसीकरण तज्ञ प्रोफेसर अॅडम फिन यांनी सांगितलं.

देशात गेल्या 24 तासांत 58 हजार 419 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे आणि 87,619 रुग्णांना डिसचार्ज देण्यात आलेला आहे. एकून 1 हजार 576 रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. देशातील आतापर्यंतचा एकून रूग्णांचा आकडा 2,98,81,965 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 3,86,713 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.