भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या : दिल्ली उच्च न्यायालय

मुंबई : दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती विपीन संघी आणि न्यायमुर्ती रेखा पाटील यांच्या खंड पीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आतापर्यंत केंद्र सरकारने काय केलं? अशा शब्दात उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा केली. देशातील ऑक्सिजनचा पुरवठा पुरेल असा नाही. मग तुम्ही आतापर्यंत काय केलं. पेट्रोलियम आणि स्टील या उद्योगांकडून ऑक्सिजन वळवला का नाही, हे करण्यासाठी इतकी टाळाटाळ का केली जात आहे? स्टील प्लांट चालवन एवढं महत्वाच आहे का? टाटांना विचारा ते मदत करतील, आपन लोकांना मरू देऊ शकत नाही असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मॅक्स रुग्णालयाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की रुग्णालयाकडे 3 तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. रुग्णालयात असलेले 400 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. त्यापैकी 262 रुग्ण कोरोनाचे असल्याचे कोर्टासमोर उघड केले.

बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे 22 जनांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी सर्वत्र होत आहे. देशात सध्या ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा खुप मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे खुप हाल होतांना दिसत आहे. काहींना तर या सुविधेच्या अभावामुळे प्राण गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे.

केंद्र सरकारचे वकील ॲड. राजीव नायर यांनी दोन हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन दिल्ली येथील मैक्स रुग्णालयासाठी पाठवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment