घर घेणाऱ्यांसाठी 3/20/30/40 हा फॉर्म्युला ठरणार फायद्याचा; घर घेण्यापूर्वी एकदा नक्की पहा..!

आज मुंबईसोबतच अनेक शहरांमध्ये घरांच्या किंवा फ्लॅटच्या किमतींमध्ये झालेली वाढ बघता असं दिसून येत आहे की सर्वसामान्यांना घर घेणे कठीण झाले आहे. त्यातूनही काही मध्यमवर्गीय लोक हे गृहकर्ज घेऊन स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. पण गृहकर्ज (Home Loan) घेतल्यास त्यावर जास्त व्याज द्यावे लागते. याशिवाय अनेक वर्षांचे कर्ज असल्यानेही लोक चिंतेत असतात. तसं तर घर विकत घेताना कुठलीही अडचण येत नाही, परंतु जेव्हा घराचा ईएमआय भरावा लागतो तेव्हा परिस्थिती अवघड होऊन जाते. बरेचदा असं होतं की लोकं गरजेपेक्षा जास्त महागडे घर विकत घेतात आणि बँकेकडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज घेतात की दरमहा त्याचे EMI फेडणे कठीण होऊन जाते. आणि जरी त्यांनी EMI वेळेवर भरले तरी सुद्धा त्यांचे घराचे बाकीचे बजेट विस्कळीत होऊन जाते.

वेळेवर ईएमआय भरण्यासाठी तडजोड करावी लागते. त्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये यासाठी विशेष धोरण अवलंबले पाहिजे. त्यामुळे, कोणत्या गोष्टी घर खरेदी करताना विचारात घ्यायच्या आणि आपले बजेट कसे ठरवायचे ते आता आपण जाणून घेऊया. बिल्डरला घर घेताना किती डाऊन पेमेंट दिले पाहिजे? तसेच बँकेकडून किती दिवसांसाठी किती कर्ज घ्यावे याबद्दलचा फॉर्म्युला आता आपण जाणून घेऊया (Beneficial formula for home buyers).

फ्लॅट घेताना तपासा ‘ही’ महत्वाची कागदपत्रे; अन्यथा होऊ शकते फसवणूक, येथे क्लिक करून पहा माहिती..

घर खरेदी करताना हा फॉर्म्युला फॉलो करा

घर खरेदी करताना तुम्ही 3/20/30/40 हा विशेष फॉर्म्युला वापरावा. तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करून तुमचे आर्थिक नियोजन केल्यास, तुमच्यावर EMI चा भार पडणार नाही. तसेच यामुळे तुमच्या घरच्या बजेटवर सुद्धा ताण पडणार नाही.

3 चा अर्थ काय?

3 म्हणजे तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या घराची किंमत. तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट ही किंमत असू नये. म्हणजेच काय तर जर तुमचे एका वर्षाचे पॅकेज हे 10 लाख रुपये असेल तर 30 लाख रुपयांपर्यंतचे घर किंवा फ्लॅट तुम्हाला सहज खरेदी करता येईल. आणि जर तुमचे एका वर्षाचे पॅकेज हे 15 लाख रुपयांइतके असेल तर मग तुम्ही 45 लाख रुपयांपर्यंतचे घर विकत घेऊ शकता.

काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

20 चा अर्थ

20 ही कर्जाची मुदत आहे.10, 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी गृहकर्ज घेता येते. तुम्ही जितक्या जास्त वेळेसाठी कर्ज घ्याल तितका EMI कमी असेल. मात्र यामुळे अधिक व्याज देखील द्यावे लागेल. अशा परिस्थितीत नुकसान तुमचेच असेल. त्यामुळे कर्जाचा कमीत कमी कालावधी फक्त 20 वर्षांचाच असावा. तुम्हाला तुमचा EMI या 20 वर्षांच्या कालावधीत सहज भरता येऊ शकता.

30 चा अर्थ

30 तुमचा EMI आहे. तुम्ही दरमहा किती कमावता यावर अवलंबून, तुमचा EMI तुमच्या कमावलेल्या पगाराच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. समजा तुमचा प्रत्येक महिन्याला 75,000 रुपये पगार येत असेल तर 22,500 रुपयांपेक्षा जास्त तुमचा EMI नसावा.

40 चा अर्थ

40 हे तुमचे डाऊन पेमेंट असेल आणि जेव्हा तुम्ही घर विकत घेणार असता तेव्हा तुम्हाला काही रक्कम ही डाउन पेमेंट म्हणून द्यावी लागते. आता तर तुम्ही 95 टक्के कर्ज देखील घेऊ शकता, पण अस काही तुम्ही करू नका. तुम्ही घरासाठी 10 किंवा 20 टक्क्यांपर्यंत डाउन पेमेंट करून उर्वरित रक्कम गृहकर्जाद्वारे काढू शकता. पण तुम्ही डाऊन पेमेंट हे 40 भरण्याचा प्रयत्न करा. तुमचे एका वर्षाचे उत्पन्न जर 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही 30 लाख रुपयांचं घर खरेदी करत असाल, तर तुम्ही डाऊन पेमेंट साठी 12 लाख रुपये भरले पाहिजे. त्यामुळे फक्त 18 लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही सहज ईएमआय भरू शकता.

मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; मुंबईत म्हाडाची 1 हजार घरांची लॉटरी, या दिवशी असणार लॉटरी, येथे क्लिक करून पहा माहिती..

उदाहरणासह समजून घेऊया

जर तुमच्या पॅकेजची किंमत 9 लाख रुपये असेल आणि तुम्ही 27 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला असेल तर यासाठी तुम्हाला 10,80,000 रुपयांचे डाऊन पेमेंट भरावे लागेल. त्यानंतर तुम्ही 16,20,000 रुपयांचे गृहकर्ज घेऊ शकता. SBI होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही SBI कडून 20 वर्षांसाठी हे गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला 15,153 रुपये प्रति महिना EMI म्हणून 9.55 टक्के व्याजदराने भरावे लागतील. ही एक अशी रक्कम आहे जीची परतफेड तुम्ही अगदी सहज करू शकता. जरी व्याजदर वेळोवेळी वाढला आणि तुमच्या EMI वर त्याचा परिणाम झाला तरी देखील तुम्हाला या ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही.

Leave a Comment