खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; पहा याठिकाणी मिळेल लाभ..!

आजकाल आपले एक अलिशान घर असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. पण सध्याच्या काळात प्रचंड वाढलेल्या घरांच्या किमतींमूळे बर्‍याच लोकांना घर विकत घेता येत नाही. मुंबईत टू-बीएचके घर (2 bhk flat Mumbai) कोटीच्या घरात गेले आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरील या किंमती असल्याने त्याला हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण आता सरकार सामान्यांना घर घेण्यासाठी मोठी मदत करत आहे. सामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार पंतप्रधान आवास योजना, सिडको योजना तसेच म्हाडा योजना (Mhada Housing Scheme) इत्यादी योजना राबवून यांच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात घरे (Affordable Flats) उपलब्ध करून देत आहे. आता तुम्ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नेमके कुठे घर पाहिजे? यासाठी चॉईस फॉर्म भरू शकता. चला पाहूया संपूर्ण बातमी..

अरे वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक, येथे क्लिक करून पहा बातमी..

पंतप्रधान आवास योजनेमध्ये खूपच स्वस्तात घर मिळेल ही इच्छा ठेऊन शहरामधील 40 हजारांवर बेघर असलेल्या नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले. गेल्या बर्‍याच वर्षांपासून घरांच्या योजनेलाच (Housing Scheme) घरघर लागली होती. पण आता अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. महापालिकेकडून आता चार ठिकाणी कंत्राटदारांची मदत घेऊन पाच प्रकल्प उभारणार आहे. त्यात सात मजली अशा इमारती बांधण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक इमारतीमध्ये पार्किंग तसेच लिफ्टची व्यवस्था राहील. पहिल्या टप्प्यामध्ये किमान 11 हजार एवढी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.

याठिकाणी मिळेल चाॅईस फॉर्म भरून घर
येथे क्लिक करून पहा

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकाकडून घरे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे 40 हजारांवर लाभार्थ्यांकडून अर्ज करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना (beneficiary) घर नेमकं कुठे पाहिजे, याकरिता चॉईस फाॅर्म भरून द्यावा लागणार आहे. जर एकाच ठिकाणी घरांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्याठिकाणी ड्रॉ पद्धतीचा देखील अवलंब केला जाईल. कंत्राटदारांकडून बँक गॅरंटी आतापर्यंत भरली नाही. बँक गॅरंटी जमा केल्यानंतर वर्कऑर्डर देण्यात येणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून बांधकामाला परवानगी देण्यात येईल.

मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!

मनपा देणार चाॅईस फॉर्म

आवास योजनेमध्ये घर मिळण्यासाठी संबंधित असलेल्या लाभार्थ्याला पालिकेकडे चॉईस फॉर्म भरता येणार आहे. म्हाडाच्या (Mhada) नियमानुसार लाभार्थ्याला सुरुवातीला घरकुलाच्या एकूण रकमेच्या 10 टक्के एवढी रक्कम पालिकेकडे जमा करावी लागणार आहे. ही रक्कम जमा केल्यानंतर पालिकेद्वारे लाभार्थ्यांला घर वितरित करण्यात आल्याचे पत्र देण्यात येणार आहे. या पत्राच्या मदतीने लाभार्थीला कर्जाकरिता बँकेकडे प्रस्ताव सादर करता येणार आहे.

याठिकाणी मिळेल चाॅईस फॉर्म भरून घर
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment