अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा | अजिंठा लेणीला भेट देण्याची ऊत्तम वेळ


Saptakund Waterfall in Ajanta Caves | Best time to visit Ajanta Caves in Marathi

पर्यटन करणे सर्वानाच आवडते. त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. असे म्हणतात की जर पर्यटनाचा आनंद दुप्पट मिळवायचा असेल तर आपन त्या ठिकाणी उत्तम वेळेत जाणे गरजेचे असते.(Best time to visit Ajanta Caves in Marathi)

भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या अजिंठा लेणी (Ajanta Leni) पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात. या लेखात आपन अजिंठा लेणीला भेट देण्याची योग्य वेळ (Best time to visit Ajanta Leni) आणि तेथील सुंदर सप्तकुंड धबधबा बघणार आहोत (Saptakund Waterfall in Ajanta Leni). खरं म्हणजे हा लेख लिहत असताना खुप मज्जा येत आहे कारण अजिंठा लेणी पासून फक्त दहा कि.मी अंतरावर असलेल्या गावात बसून मी हा लेख लिहित आहे. 

आपन जेव्हा पर्यटन स्थळांना भेट देतो तेव्हा आपल्या डोक्यात अनेक प्रश्न येत असतात. तेथील हजारो काळा पासून असलेल्या वास्तू आणि कला पाहून आपन काही वेळेसाठी प्राचीन काळात जाऊन विचार करत असतो. तेथील सर्व गोष्टी जाणून घेण्यास आपन खुप उत्सुक असतो. हजारो काळापासून अस्तित्वात असलेल्या अजिंठा लेणीं सारख्या ठिकाणी भेट देणे म्हणजे हजारो वर्ष जगल्या सारखा अनुभव येतो.

अजिंठा लेणीला भेट देण्याची योग्य वेळ (Best time to visit Ajanta Caves in Marathi)

खरं तर अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी तीनही ऋतू चांगले आहेत. कारण या तीनही ऋतू मध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात. पण अतिवृष्टीचा आणि कडक उन्हाचा जर विचार केला तर मी तुम्हाला ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी बेस्ट आहे असं सांगेन.

मोठ्या प्रमाणात पर्यटक याच कालावधीत येत असतात. पण या कालावधीत आपल्याला अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा (Saptakund Waterfall in Ajanta Caves) बघायला मिळत नाही. हिरव्या शालूत नटलेली अजिंठा लेणी आपल्याला फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बघायला मिळते. म्हणून हिरव्या शालूत नटलेली अजिंठा लेणी आणि सुंदर सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी एकदा तरी पावसाळ्यात नक्कीच भेट द्यायला हवी.

पावसाळ्यातील काही छायाचित्रे

Best time to visit Ajanta Caves in Marathi
View point of Ajanta leni

अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा (Saptakund Waterfall in Ajanta Caves)

जर का तुम्ही ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी येत असाल तर तुम्ही पावसाळ्यात सुरु होणारा अजिंठा लेणीतील सुंदर सप्तकुंड धबधबा (Saptakund Waterfall in Ajanta Caves) मिस कराल. कारण बहुतांश पर्यटक याच कालावधीत येत असतात. त्यामूळे त्यांना अजिंठा लेणीतील सुंदर धबधबा पाहता येत नाही. म्हणून मी तुम्हाला खाली दिलेल्या माझ्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सुंदर धबधबा दाखवला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी आपल्याला अजिंठा लेणीतील View Point वर जावे लागते.

हा धबधबा पावसाळ्यात सारखा चालू राहत नाही. जेव्हा जोरात पाऊस पडेल तेव्हाच आपन त्याची सुंदरता बघू शकतो. सुरू असलेल्या पाऊसामूळे त्याची सुंदरता अजूनच वाढली आहे.

या व्हिडिओ मध्ये सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामूळे हा सुंदर धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक लोक गर्दी करत असतात.

भारत पर्यटनासंबंधी अधिक लेख मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक दिवसाचा खर्च? जाणून घ्या रोचक माहिती