तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की अधुरे राहणार? घरांच्या किमतीत मोठा बदल, पहा तुमच्या शहरातील घराच्या किमती..!

1 bhk flat : देशामध्ये माहिती तंत्रज्ञान केंद्र असलेल्या महानगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घरांची मागणी खूपच वाढलेली आहे. घरांची मागणी खूपच वाढल्यामुळे घरांच्या किमती देखील त्याच प्रमाणात वाढू लागल्या आहेत. सामान्य लोकांसाठी ही बाब अतिशय चिंताजनक आहे, कारण देशातील काही भागात घरांच्या किमतीत गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल 33 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामध्ये पुण्यातील माहिती तंत्रज्ञान केंद्र असणार्‍या वाघोली आणि हिंजवडी या भागामध्ये घरांच्या (1 bhk flat Pune) किमतींमध्ये अनुक्रमे 22 ते 25 टक्के एवढी वाढ नोंदविण्यात आली आहे.

अलिकडेच अनारॉक ग्रुपकडून मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑक्टोबर 2020 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीचा मालमत्ता क्षेत्राचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे यात राज्यातील मुंबई (Mumbai) आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. तसेच दिल्ली, कोलकता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई या महानगरांचा समावेश आहे.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरामध्ये हैदराबादमधील गच्चीबावली या भागामध्ये घरांच्या किमती (Homes rates) सर्वात जास्त 33 टक्क्याने वाढल्या आहेत. त्याखालोखाल हैदराबाद येथील कोंडापूर या भागात 31 टक्क्यानी किमती वाढल्या आहेत. हैदराबादमधील गच्चीबावली या भागात यंदा घरांची सरासरी किमत ऑक्टोबरमध्ये प्रति चौरसफूट 6 हजार 355 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2020 मध्ये हीच किंमत प्रति चौरसफूट 4 हजार 790 होती.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

तसेच बंगळुरूमधील व्हाईटफिल्ड या भागामध्ये घरांच्या किमती गेल्या 3 वर्षांत प्रति चौरसफूट 4 हजार 900 रुपयांवरून 6 हजार 325 रुपयांवर गेल्या आहेत. मुंबई आणि दिल्लीतील मुख्य भागामधील घरांच्या किमती (Flats rates in Delhi & Mumbai) तीन वर्षांमध्ये सरासरी 13 ते 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीत ग्रेटर नोएडा या भागामध्ये 27 टक्के आणि मुंबईतील लोअर परळ या भागामध्ये 21 टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

यंदा झाली घरांची उच्चांकी विक्री (High Flat Selling)

यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सणासुदीत होत असलेली घरांची खरेदी संपली आहे. त्यामुळे या वर्षामधील घरांच्या सर्वात जास्त विक्री असलेला काळ देखील ओसरला आहे. देशभरामधील सातही महानगरांमध्ये यंदा घरांना चांगलीच मागणी दिसून आली. त्यासोबतच घरांच्या विक्रीत देखील मोठी वाढ नोंदविण्यात आलेली आहे. घरांच्या विक्रीबाबत यंदा 2014 नंतरची उच्चांकी पातळी गाठली आहे, असे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment