काय सांगता! म्हाडाच्या ‘या’ योजनेत झाला मोठा बदल; मुंबईत स्वस्तात प्रॉपर्टी घ्यायची? पहा बातमी..!

मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) घेण्याची अनेकांची इच्छा असते. खिशाला परवडेल अशा दरात ही घरे मिळत असल्याने सर्वसामान्यांना म्हाडाचा (Mhada) आधार मिळतो. घर विक्री करण्याबरोबरच आता म्हाडाकडून प्लॉट विक्री आणि दुकान विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे आता सामान्यांना मुंबईत प्लॉट आणि दुकाने घेणे शक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईतील दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सध्या या दुकानांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पण आता म्हाडाच्या या दुकानांच्या योजनेत मोठा बदल झाला आहे. चला जाणून घेऊया महत्वाची माहिती.. (Mhada Lottery 2024)..

मुंबईतील म्हाडाच्या 173 दुकानांची (Mhada Shops) जाहिरात 27 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. आणि ई-लिलावासाठी अर्ज प्रक्रिया 1 मार्च पासून सुरु झाली. परवडणाऱ्या किमतीची ही दुकाने (Affordable Shops Mumbai) असल्याने या दुकानांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दुकानांसाठी 25 लाखांपासून ते 13 कोटी पर्यंतची बोली निश्चित केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; मुंबईत म्हाडाची 1 हजार घरांची लॉटरी, या दिवशी असणार लॉटरी, येथे क्लिक करून पहा माहिती..

मुंबईतील दुकानांच्या योजनेत झाला हा बदल..

म्हाडाच्या मुंबई मंडळाने दुकानांच्या योजनेत बदल केला असून आता या योजनेला 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाल्याने जास्तीत जास्त लोकांना दुकानांसाठी अर्ज करता येणार आहे. या 173 दुकानांच्या योजनेसाठी (Mhada Scheme) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती आणि बोली लावण्याची मुदत सोमवारी रात्री संपणार होती, पण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या योजनेस 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

Leave a Comment