पीएम किसान योजनेत मोठा बदल,…अन्यथा एकही हप्ता मिळणार नाही…

पीएम किसान योजनेत मोठा बदल | Big change in PM Kisan Yojana, do this work quickly

सरकारी योजना असो की अन्य कोणतेही नियम सरकार यामध्ये वेळोवेळी गरजेनुसार बदलाव करत असते. आणि तो बदल घडवून आणणे खुप गरजेचे असते. मोदी सरकारने अलीकडेच पीएम किसान योजने मध्ये मोठा बदल केला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आता e-KYC करावी लागणार आहे. (Big change in PM Kisan Yojana, do this work quickly)

पीएम किसान योजना | PM Kisan Yojana

देशातील शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य मिळावं म्हणून केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवीत आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षीक 6 हजार रुपये तीन टप्प्यांत दिले जातात…

हे पण वाचा

सोयाबीन बाजार भाव

पीएम किसान योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच दिला जात आहे. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना थोडा का होईना सहारा मिळाला आहे. पण मोदी सरकारने या मध्ये काही बदल केले आहे. जे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

शेती व शेती विषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आता या पुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करून घ्यावी लागणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता पर्यंत मिळालेल्या 9 हप्त्यांचा लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना सुध्दा e-KYC करावी लागेल. जे शेतकरी e-KYC करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या पूढचा एकही हप्ता मिळणार नाही.

घरी बसून करा e-KYC

तुमच्याकडे जर एक एंड्रॉइड मोबाइल किंवा कंप्यूटर असेल तर तुम्ही घरी बसून या e-KYC ची प्रक्रिया पुर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला PM Kisan योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर यावं लागेल. त्यानंतर Farmer Corner मध्ये सर्वात वर e-KYC New असं बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून आधार नंबर व कॅप्चा कोड भरा. अशा पध्दतीने तुम्ही घरी बसून e-KYC पुर्ण करू शकता. तुमच्या कडे मोबाइल व कंप्यूटर नसेल तर जवळ असलेल्या CSC केंद्रावर जाऊन e-KYC पुर्ण करा…

Leave a Reply

Your email address will not be published.